धुळे : जिल्हा दुष्काळ मुक्त होवून सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून विविध प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत धुळे व शिंदखेडा तालुक्यातील २०० गावांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकाºयांनी रविवारी धुळे तालुक्यातील बिलाडी येथील श्रमदानात सहभागी झाले़ शहरातील व्यापाºयांच्या विविध १९ संघटनांचा हा व्यापारी महासंघ आहे. या महासंघाच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेवून पानी फाऊंडेशनच्या कामात श्रमदान व लोकसभा निवडणूक करीता लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांना बिलाडी गावात जावून श्रमदान करावे, अशा सूचना केल्या होत्या.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडिया, धनंजय रायचूर, महेंद्र सोनार, अजय नाशिककर, सुनील रुणवाल, प्रशांत देवरे, दीपक भावसार, भिमजीभाई पटेल, मंदार महाजन आदी पदाधिकारी दर रविवारी सकाळी स्वत:च्या वाहनाने घरुन बिलाडीकडे जाण्यासाठी निघतात. तेथे जवळपास दोन तास ते श्रमदान करतात. दोन तास श्रमदान केल्यावर महासंघाचे पदाधिकारी पुन्हा धुळ्याकडे परततात. गेल्या तीन रविवारपासून हा उपक्रम सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून व्यापारी महासंघाचे पदाधिकारी बिलाडी गावात जावून श्रमदान करीत असतात. तेथील काम पूर्ण झाल्यावर जिल्हा प्रशासनाने सांगितले, तर दुसºया गावात श्रमदानासाठी अवश्य जावू, असे रायचूर यांनी सांगितले.
व्यापायांच्या श्रमदानातून जलसंधारणाची काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:46 AM
पाणी फाऊंडेशन : धुळ्यासह शिंदखेडा तालुक्यातील २०० गावांचा लोकसहभागात सहभाग
ठळक मुद्देdhule