शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:19 PM

उन्हाळा : थंड पेयाची दुकाने बंद, यंदा पाण्यावरच भागतेय तहान, उन्हाळ्यात घरगुती उपायांवर भर, रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : एप्रिल महिन्यात उन्हाची तिव्रता वाढली असून चटके जाणवू लागले आहेत़ शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे़एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांची संचारबंदी तर दुसरीकडे कडक उन्हाळा पडला आहे़ त्यामुळे उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत़ रस्त्यावर माणसांची रहदारी कमी असल्याने तेवढा परिणाम जावणत नाही़ मात्र कोरोनाच्या संकटामुळे थंड पेयावरही संकट उभे ठाकले आहे़त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेकांना थंड पेयाऐवजी आपली तहान घरातील पाण्यावर भागवावी लागत आहे़ बाजारात कलिंगड विक्रीला येतात पण ग्राहकच नसल्याने कवडीमोल भावाने ही फळे विकावी लागत आहेत़ऋतुकाळाप्रमाणे एप्रिल महिला सुरू होताच उष्णतेचे चटके बसू लागले आहेत़ खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे़ बाहेर फिरतांना उष्णतेचे चटके अंगाला जाणवतात़ कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक दुकाने वगळता शहरात सर्वच बंद ठेवण्यात आले आहेत़ त्यामुळे शीतपेय तसेच इतर फळे मिळणे आता दुरापास्त बनले आहे़पहाटे-सकाळच्या सुमारास हवेत थोडा गारवा असला तरी बाराच्या नंतर अचानक उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते़ बाजारात लॉकडाऊन असल्याने एक तर गर्दी नसते़ त्यामुळे उन्ह्याची तीव्रता जाणवत नाही़अंगातून घामाच्या धारा वाहात असल्याने गर्मीचे प्रमाण अधिक वाढलेले असेच जाणवते़ लॉकडाऊन काळात पोलिस सतत रस्त्यावर असतात़ त्यांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे़ सध्या गावागावात लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कोणीही दिसत नाही़ तसेच मुले क्रिकेट खेळतानांही दिसत नाही़ त्यामुळे मुलांना घरातच बसावे लागत आहे़गेल्या वर्षापर्यंत उन्हाळा आला की सुटीचे दिवस सुरू झाले असे म्हणावे लागत असत़अनेकजण सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी नदीपात्रात पोहण्यासाठी अथवा मोकळ्या जागेवर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यासाठी जात असत, पण यावेळी तशी संधीही मिळत नाही़ बाहेर जाणे सोडा पण स्वत:च्या घरातून बाहेर पडतांना पोलिसांची लाठी आता पाठीत पडेल की नंतर अशीच स्थिती सध्या सर्वत्र आहे़ त्यामुळे थंड पेय लॉकडाऊनच्या गर्तेत सापडले आहेत़गेल्या २१ दिवसांपासुन घरात राहून कंटाळलेल्या नागरीकांना लॉकडाउन शिथील होण्याची प्रतिक्षा आहे़ परंतु मुख्यमंत्र्यांनी ३० तारखेपर्यंत लॉकडाउन कायम केल्याने चिंता वाढली आहे़प्रकल्पांमधील सध्याचा जलसाठाशिरपुरात घराघरात पाण्याची तीव्रता सध्यातरी भासत नसली तरी करवंद धरणाच्या पाण्याच्या पातळीत घट होतांना दिसत आहे़ तीव्र उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी सध्यातरी घटत आहे़ आजपर्यंत करवंद धरणात ४० टक्के पाण्याचा साठा कागदोपत्री दिसत असला तरी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ अनेर धरणात ५८ टक्के पाण्याचा साठा आहे़ अभणपूर धरणात ४५ टक्के, बुडकी १२, गधडदेव २८, जळोद १५, कालीकराड १६, खामखेडा १५, लौकी २२, मिटगांव ५, नांदर्डे ४५, रोहिणी २, विखरण ४, वाडी ७, वकवाड धरणात ७ टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे़

टॅग्स :Dhuleधुळे