ऑनलाई लोकमत/सुनील सांळुखे
शिरपूर, जि.धुळे, दि.4- उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असली तरी शिरपूर शहरासाठी आरक्षित असलेल्या करवंद धरणात समाधानकारक पाणी साठा असल्याने शहरवासियांना 24 तास शुद्ध पाणी सोडण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यात 2 मध्यम प्रकल्पासह 11 लघू प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतार्पयत दीडशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आह़े
गेल्या पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु, काही बंधारे कमी-अधिक पावसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधा:यात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर आटले. गेल्या वर्षी नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच धरणे व बंधारे कोरडठाक पडली आहेत.
आदिवासी पाडय़ात भीषण टंचाई
उन्हाची तीव्रता वाढत असताना आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आह़े आदिवासी पाडय़ांवर तर 2-4 किमीर्पयत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आह़े काही पाडय़ांवर तर मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
टंचाई असतानाही टॅँकर सुरू नाही
तालुक्यात पाण्याची टंचाई असतानाही अद्याप एकही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू नाही. अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर आह़े त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आह़े संभाव्य पाणीटंचाई होवू शकते म्हणून प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आह़े
करवंद धरणामुळे शहरातील नागरिकांना दिलासा
करवंद व अनेर प्रकल्पात ब:यापैकी पाणी साठा आह़े पैकी करवंद धरणाचे सुमारे 100 दशलक्ष घन फूट पाणी शहरासाठी आरक्षित आह़े हे पाणी साधारणत: जुलै अखेर्पयत पुरू शकणार असल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. तर अनेर धरणात 50 टक्के पाणी असून येत्या मे-जूनमध्ये कापसाची लागवड करणा:या शेतक:यांच्या पिकांसाठी हे पाणी पुरविले जाणार आह़े त्यामुळे सध्या दोन्ही धरणातील पाटचारीच्या माध्यमाने सोडण्यात येणारे पाणी बंद केले आह़े आजमितीस अनेर धरणात 50 टक्के तर करवंद धरणात 26.50 टक्के पाणीसाठा आह़े
धरणांमधील पाणी साठा असा :
धरण क्षमता साठा दशघमी टक्के
करवंद 18.26 4.87 26.50
अनेर 49.27 25.47 50
बुडकी 1.73 0.24 5
वकवाड 2.67 0.15 2
बुडकी 1.73 निरंक---
वाडी 1.34 निरंक---
जळोद 2.11 निरंक---
विखरण 1.90 निरंक---
कालीकराड 1.99 निरंक---
रोहिणी 0.96 निरंक---
नांदर्डे 3.60 निरंक---
गधडदेव 1.53 निरंक---
मिटगांव 1.02 निरंक---