शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:43 PM

शिंदखेडा : महात्मा फुले जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचचा अनोखा उपक्रम

शिंदखेडा : महात्मा फुले जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचच्यावतीने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचतर्फे शहरातील माळी दरवाजा येथे प्रतिमापूजन करून मिरवणुकीवर होणारा खर्च वाचविण्यात आला. त्यातून वरूळ घुसरे व होळ या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तीव्र पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व गुरांसाठी हाळ भरून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे नागरिकांना व पशुधनास पाणी मिळाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी युवकांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.यंदा दुष्काळाची झळ लक्षात घेऊन विविध कार्यक्रमांसाठी खर्च न करता शिंदखेडा तालुक्यातील अतिशय तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांची निवड करून मोफत पाणी पुरवठा या जयंतीनिमित्ताने सुरू करण्यात आला. यासाठी देणगी स्वरूपात टँकरभर पाण्याची मागणी करण्यात आली. हा उपक्रम चांगला असल्याने लोकांनीही सढळ हाताने या युवकांना मदत केली. या युवकांनी वरूळ व होळ गावातून या उपक्रमाची सुरुवात देखील केली आहे. दुपारनंतर होळ या गावी रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला. या दोन्ही गावात या युवकांमार्फत दररोज एका टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर हातनूर या गावातही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार संजय महाजन यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष प्रा.अनिल माळी यांनी गावातील नागरिकांना उपक्रमाची माहिती देऊन पाण्याचे महत्व स्पष्ट केले.याप्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रविण माळी, उपाध्यक्ष, योगेश माळी, खजिनदार मुकेश माळी, सचिव कुणाल जाधव, सहसचिव भरत माळी, व्यवस्थापक वासुदेव माळी, सल्लागार अ‍ॅड.प्रशांत जाधव, मंडळाचे सभासद निवृत्ती माळी, हरीश माळी, उमाकांत माळी, किशोर माळी, नरेश परदेशी, विकास कोळी, ज्ञानेश्वर माळी, केशव माळी, गणेश माळी, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.या उपक्रमासाठी शहरातील विविध राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनी आर्थिक व टँकर स्वरूपात मदत उपलब्ध करून दिली. येत्या काही दिवसांसाठी सदर उपक्रमाद्वारे विविध गावात पिण्यासाठी तसेच गुरांसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कुणाला काही मदत करायची असेल तर त्यांनी टँकर स्वरूपात पाण्याची मदत करण्याचे आवाहनही केले.

टॅग्स :Dhuleधुळे