धुळे : जागतिक चिमणीदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय हरित सेना विभाग आणि निसर्ग मित्र समिती, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे भांडे (वाडगे) आणि पक्षांसाठी घरटे यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर डियालानी होत. यावेळी २५ पाण्याची भांडी आणि सुमारे ११० पक्ष्यांची कागद व पुठ्ठ्याचा वापर करून बनवलेली घरटी यांचे वाटप केले. निसर्गमित्र समितीचे प्रदेश संघटक आणि लायन्स क्लबचे चेअरमन किशोर डियालानी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना आणि काही पालकांना भांडे, घरटे वाटप केले. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख डॉ. किशोर अरगडे यांनी मानवासाठी पक्ष्यांचे महत्त्व, त्यापासून मिळणारे लाभ आणि पक्षी नष्ट झाल्यास होणारे दुष्परिणाम तसेच पक्ष्यांचे संवर्धन ही काळाची गरज कशी आहे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .डियालानी यांनी सर्वांनी पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे, भविष्यात पक्षी असतील तरच मानवी अस्तित्व टिकून राहील. त्यासाठी मागतील त्यांना मोफत मातीची भांडी दिली जात आहेत असे प्रतिपादन केले. यावेळी आय. एस.जमादार यांनी आभार मानले.
पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी,घरट्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:17 PM