लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वनहक्क दाव्यांची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्यामुळे आदिवासींनी शुक्रवारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन तूर्त मागे घेतले असल्याची माहिती सुभाष काकुस्ते यांनी दिली़ वनहक्क कायद्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित असलेले सर्व वनदावे तात्काळ मंजूर करावेत, सामुहिक वनहक्क दावेही मंजूर करावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने धुळ्यात शुक्रवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला़ वनविभागासह जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तसेच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाशी जिल्हाधिकाºयांनी चर्चा केली. यावेळी सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, वंजी गायकवाड, रामसिंग गावित, यशवंत माळचे, मन्साराम पवार, लिलाबाई अहिरे यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या चर्चेत सहभाग घेतला़ या दरम्यान मोर्चातील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडला होता़ रात्री उशिरापर्यंत हा ठिय्या कायम होता़ वन हक्क दाव्यांची विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली जाईल़ त्याचवेळी पुरावे देखील तपासले जातील़ तपासणीअंती पात्र आणि अपात्र याची पडताळणी करु़ पाणीटंचाईचा काळ असल्याने नागरिकांसह गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडेही लक्ष दिले जाईल, असे विविध मुद्यांवर जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली़ त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आल्याचे काकुस्ते यांनी सांगितले़
धुळे जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांची चौकशी करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:43 AM