लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बुधवारी १९२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे शहरातील तीन, धुळे तालुक्यातील कापडणे, सोनगीर व शिंदखेडा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी रात्री दोंडाईचा व शिरपूर येथील रुग्णाचा मृत्यू झाला होता. बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील १०१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ३१, शिंदखेडा तालुक्यातील तीन, शिरपूर तालुक्यातील ३९ व साक्री तालुक्यातील १८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ६७० इतकी झाली आहे.