शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धुळे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:42 AM

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अंदाज : असमाधानकारक पावसाचा परिणाम, हरभºयाचे क्षेत्र घटणार

ठळक मुद्देजिल्ह्यात रब्बीचे ९० हजार १९ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट धुळे, शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवड अशक्यहरभºयाचे क्षेत्रही घटणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ९० हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे    जिल्ह्यात रब्बी हंगामातील  गव्हाच्या क्षेत्रात ७० तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. त्यातल्या त्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवडच होऊ शकणार नाही, अशी माहिती  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली. रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याने, खतांची मागणीही कमी होणार आहे.धुळे जिल्हयात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. सुरवातीच्या कालावधीत दमदार पाऊस झाल्याने, खरिपाच्या पिकांची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला.श्रावण  महिना कोरडा गेला. तर परतीच्या पावसानेही दडी मारली. त्यामुळे खरिप पिकांचे जवळपास ५० टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे.ज्वारीचे पीक केवळ चारा म्हणूनच हातात आलेले आहे. धुळे, शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दुष्काळाची स्थिती आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या लागवडीवर होणार आहे. लागवडीचे क्षेत्रात घट होणारकृषी विभागाने उद्दिष्ट निर्धारित केलेले असले तरी पाण्याअभावी रब्बीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गहू व हरभरा या पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. मात्र यावर्षी पाण्याचा अभाव असल्याने गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. जिल्हा कृषी विभागाने २०१८-१९ या वर्षात रब्बी क्षेत्राचे ९८ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.  यात ४३ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असतांना तेथे १४ हजार ४०१ हेक्टरवर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर त्या खालोखाल साक्री तालुक्यात १२ हजार ८४२,  धुळे तालुक्यात ८ हजार ५९७, तर शिरपूर तालुक्यात ८ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे.  हरभºयाची ३२ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आता पाण्याअभावी हे उद्दिष्ट कसे गाठणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यातही धुळे व शिंदखेडा तालुक्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी  गव्हाची लागवड होणे कठीण आहे. फक्त शिरपूर व पिंपळनेर याच भागात पाणी काही प्रमाणात असल्याने त्याठिकाणी थोड्याफार प्रमाणात गहू, हरभºयाची लागवड होऊ शकते असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे