साक्री : दूध डेअरीसाठी जमीन खरेदीत दोन लाखांची लाच घेणा:या प्रभारी दुय्यम निबंधक परशुराम अहिरे यांच्यासह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. गुरुवारी सायंकाळी साक्रीतील दुय्यम निबंधक कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांना दिघावे (ता़साक्री) शिवारातील दूध डेअरी व लगतची 3 एकर जमीन खरेदी करावयाची होती़ त्यासाठी दुय्यम निबंधक परशुराम काशिनाथ अहिरे (वय 50) व कनिष्ठ लिपिक अशोक ईश्वरलाल सोनकांबळे यांनी रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी सहा लाख रुपये लाचेची मागणी केली़ तडजोडीनंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने धुळे एसीबी यांच्याकडे तक्रार केली़एसीबीने गुरुवारी सायंकाळी साक्री दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावला़ (पंटर) दीपक कृष्णा ठाकूर याने दोन लाख रुपये लाच घेताच पथकाने तिघांना रंगेहाथ पकडले.
लाच घेताना त्रिकूट जाळ्यात
By admin | Published: February 03, 2017 1:04 AM