आॅनलाइन लोकमतधुळे :एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याचबरोबर एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना वाढीव पेन्शन मिळाले नाही तर २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा ठराव आज करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळ निवृत्त कर्मचारी संघटनेचे २३ वे राज्यस्तरीय अधिवेशन गुरूवारी कामगार कल्याण भवनात झाले. या अधिवेशनात हा ठराव मंजूर करण्यात आला. या राज्य अधिवेशानच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागाचे उपाध्यक्ष दिनकरराव पिंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे (ठाणे), सचिव श्रीराम गालेवाड, जगदीश अंबोरे, गणेश वाळपकर आदी होते. या वेळी मार्गदर्शन करतांना सदानंद विचारे म्हणाले. एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना मिळणारे पेन्शन हे अतिशय तोडके आहे. केंद्राने एस.टी.च्या सेवानिवृत्तांना वाढीव पेन्शनच्या लाभापासून परावृत्त केले आहे. महामंडळाच्या कर्मचाºयांना वाढीव पेन्शन मिळाले नाही तर २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू. त्याचबरोबर संघटनेचे सर्व सभासद हे सरकार विरोधात मतदान करतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयास व त्याच्या पत्नीस मोफत पास मिळावा अशी मागणी होती. शासनाने ती मंजूर केली. मात्र त्याची अद्याप अमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे मोफत पास योजनेपासून वंचीत आहेत. हा पास राज्य शासनाने लवकर दिला नाही, तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही ठराव यावेळी करण्यात आल्याची माहिती एस.टी.कर्मचारी संघटनेचे धुळे अध्यक्ष योेगेंद्रसिंग राजपूत यांनी दिली. या राज्य अधिवेशनाला मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण, नागपूर, खान्देश विभागातील जवळपास दोन हजार सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेंद्रसिंग राजपूत यांनी तर आभार एस.डी. जाधव यांनी मानले. या वेळी पी.वाय. भट, एम.के. भामरे, एस.टी.पाटील, डी.डी.नाईक, पोपट चौधरी, आर.बी.पाटील, टी. जी. जयस्वाल, संजय ढगे, आर. व्ही.बडगुजर,आर.आर. वाकडे, वाय.एन.साळवे,एम.एस.भदाणे, झेड. एच. राजपूत, एल.जे. जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
...तर लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 7:59 PM
धुळे येथे राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात ठराव पारीत
ठळक मुद्देअधिवेशनासाठी राज्यातील प्रतिनिधी उपस्थितविविध विषयांवर झाली चर्चादोन ठराव केले मंजूर