शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
5
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 स्‍टॉक...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
6
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
7
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
9
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
10
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
11
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
12
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
13
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
14
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
15
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
16
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
17
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
18
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
19
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
20
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

Vidhan Sabha 2019: नर्मदा व ‘उकई’चे पाणी आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 10:22 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शहादा येथील प्रचारसभेत दिले आश्वासन,धुळे तालुक्यातील नेर येथून केला प्रचाराचा शुभारंभ

धुळे/नंदुरबार : नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील १० टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले जाईल. उकईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहादा येथील सभेत बोलतांना केले. त्याआधी बुधवारी दुपारी नेर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर शिरपूर येथे अमरिशभाई पटेल यांचा भाजप प्रवेश आणि सायंकाळी साक्री येथे प्रचार सभा केली. त्यात पांझरा - कान सुरु करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी प्रचारसभा घेतल्या.नेर येथून प्रचाराचा शुभारंभधुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचार सभेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा प्रचाराचा श्रीगणेश केला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, अक्कलपाडा पाठोपाठ आता सुलवाडे जामफळ धरणासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे पुढील ४ वर्षात हा प्रकल्प मार्गी लागेल हा विश्वास आहे़ यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर बुधा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे मनोहर भदाणे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांच्यासह भाजप पदाधिकरी उपस्थित होते.शिरपूर पॅटर्नमुळे राबविलेजलयुक्त शिवार अभियानशिरपूर - येथील आऱसी़पटेल फॉर्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विजय संकल्प सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खऱ्या अर्थाने दुष्काळ मुक्तीचा मार्ग ‘शिरपूर पॅटर्न’ने उभ्या महाराष्ट्राला समजवला़ याच ‘शिरपूर पॅटर्न’सोबतच वेगवेगळ्या पॅटर्नचा अभ्यास करून जलयुक्त शिवार योजना राज्यात सुरू करण्यात आली़ ज्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले अन् राज्यातील १९ हजार गावे दुष्काळमुक्त झालीत़ तेच काम यापूर्वीच आमदार अमरिशभार्इंनी या तालुक्यात आधीच करून दाखविले आहे़ अमरिशभाई इतके वर्षे काँग्रेसमध्ये राहिलात मात्र काँग्रेसच्या सरकारने त्यांना काहीही मदत केली नाही, मात्र त्यांनी स्वत:च्या भरोसावर विकास करून दाखविला़ यापुढे हे सरकार तुमच्या सोबत असल्यामुळे विकासाचा वेग डबल गतीने वाढणार असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या ५ वर्षाच्या काळात ५० हजार कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली़ शेतकºयांसाठी कर्जमाफी केली़ जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे केलीत़ मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ३० हजार किमीचे ग्रामीण रस्ते तयार केलेत़ ९ हजार ५०० कोटी रूपयांच्या मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाला मान्यता दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.दगाफटका होणार नाहीअमरिशभार्इंची ग्वाहीभाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री अमरिशभाई पटेल म्हणाले की, फक्त शिरपूर तालुक्याच्या विकासासाठीच भाजपात प्रवेश केला आहे़ शिरपूर पॅटर्नचे काम या तालुक्यात होत आहे यासाठी आपल्यास्तरावर मदत करावी़ मनमाड-इंदौर रेल्वे मार्गात शिरपूरला जंक्शन स्टेशन व्हावे, बंद असलेला साखर कारखाना सुरू व्हावा याकरीता मदत करावी़ तसेच लवकरच याठिकाणी ३५० खाटांचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजनासाठी आपण यावे असे सांगून भाजपातील कोणत्याही पदाधिकाºयांना दगा फटका होणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली़यावेळी भाजप उमेदवार विद्यमान आमदार काशिराम पावरा व्यासपीठावर उपस्थित होते.वन पट्टे, वनजमिनीचे राहिलेलेदावे एक वर्षात निकाली काढूनंदुरबार - शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी, नंदुरबार मतदार संघाचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधक आदिवासींचे आरक्षण काढणार अशा खोट्या अफवा पसरवत आहेत. परंतु जगाच्या पाठीवर कोणीही आदिवासीचे आरक्षण काढू शकत नाही. संविधानाने त्यांना तसे अधिकार दिले आहे. आदिवासी बांधवांना कधी नव्हे एवढ्या योजना पाच वर्षात राज्य शासनाने दिल्या. वन पट्टे, वनजमिनीचे राहिलेले दावे एक वर्षात निकाली काढण्यात येईल.तसेच नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील १० टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले जाईल. उकईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.यावेळी शहादा - तळोदा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजेश पाडवी आणि नंदुरबारचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.सभेत यावेळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.पांझरा - कान साखरकारखाना सुरु करणारसाक्री - येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या मैदानात भाजपचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा शिवसेना युती चे सरकार राज्यात सत्तेवर येणार असून येणाºया काळात साक्री तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पांझरा कान साखर कारखाना सुरु करणार. तसेच साक्री तालुक्यातील जे गावे पेसा कायद्यात येत नाही त्या सर्व गावांना पेसामध्ये घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. साक्री तालुक्यातून जाणाºया महामार्ग क्रमांक सहा चे काम लवकरच सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यावेळी उमेदवार मोहन सूर्यवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.माजी मंत्री अमरिशभाई पटेल दहिते, शिरपूर नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा भाजप प्रवेश४शिरपूर येथील झालेल्या सभेत माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासह काँग्रेसे माजी जि.प.अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी जि.प.अध्यक्षा संगीता देसले, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, दोंडाईचा येथील रवीराज भामरे यांच्यासह नगरसेवक, जि़प़, पं़स, तसेच विविध संस्थानचे पदाधिकारी यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.४सन १९८५ मध्ये अमरिशभाई पटेल यांनी तालुक्यात एंट्री केल्यानंतर ते सुरूवातीला नगरपालिकेत स्वीकृत सदस्य झाले़ अवघे काही दिवसात ते नगराध्यक्ष सुध्दा झाले़ तेव्हापासून त्यांनी तालुक्यावर वर्चस्व राखत एकहाती सत्ता काबीज केली़४सन १९९० मध्ये पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आलेत़ त्यानंतर १९९५, १९९९ व २००४ मध्ये असे सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेत़ मात्र त्यानंतर हा मतदार संघ राखीव झाला़ त्यानंतर ही ते दोनदा विधान परिषदेवर निवडून आलेत़ त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार काशिराम पावरा हे ही सलग दुसºयांदा निवडून आले आहेत़ आता ते तिसºयांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत़हेलिपॅडवरच मुख्यमंत्र्यांशी रघुवंशींची चर्चाँमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहाद्यातील सभेसाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे उपस्थित नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार धडगाव येथे त्यांची नियोजित प्रचार सभा असल्यामुळे त्यांनी लोणखेडा येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील युतीची स्थिती व एकुणच प्रचार याबाबत त्यांनी चर्चा केली. लागलीच तेथून ते धडगावकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे