धुळे : शासनातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. केवळ ही योजना सरकारी असल्यामुळे आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणून चालणार नाही. तसेच या योजनेचा गैरफायदा किंवा त्याला गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधिताला गय केले जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. जिल्हा परिषद व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शुक्रवारी दुपारी शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर कल्पना महाले, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जि.प.चे सीईओ गंगाथरन देवराजन, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, भाजपाच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, मनपा विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहिद अली सैय्यद यांनी केले. अडचणीतून मार्ग काढा पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, की जिल्ह्यातील ग्रामीण भागात हगणदारीमुक्तीचे ७३ टक्के काम झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी येणाºया अडचणींवर मात करून काम पूर्ण केले पाहिजे. यासाठी कर्म ही पूजा हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवावे. हे अभियान केवळ १५ ते २ आॅक्टोबर याकालावधित न राबवता पुढच्या पिढीचाही विचार करून राबवावे. हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे. निधीच्या अडचणी आल्या तरी त्याबाबत विचार न करता काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी येथे केले. ग्रामसेवकांचे बहिष्कार आंदोलन मागे!‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहभागातून राबविले जाणार आहे. परंतु, ग्रामसेवकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी बहिष्कार आंदोलन पुकारले होते. त्यापार्श्वभूमीवर येथील आढावा बैठकीपूर्वी ग्रामसेवकांशी यशस्वी चर्चा झाली आहे. त्यांना शासनाच्या ध्येय धोरणांबाबत माहिती देण्यात आली. तसेच त्यांचे प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे आश्वासन दिले असून त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांनी येथे दिली. डिसेंबर २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त जिल्हा करणार जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, की स्वच्छतेसाठी शासनातर्फे अभिवन योजना राबविली जात असताना हगणदारीमुक्तीसाठी अजुनही अनेकांची मनोवृत्ती बदललेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाची मनोवृत्ती बदलली तर जिल्हा हगणदारीमुक्त होणे सहज शक्य आहे. आतापर्यंत वैयक्तीक शौचालये बांधून दिल्यानंतरही ग्रामीण भागातील अनेक जण त्याचा उपयोग करताना दिसत नाही. जुन्या कल्पना सोडून देऊन नागरिकांनी त्यांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत धुळे जिल्हा हगणदारीमुक्त करणार असल्याचे आश्वासन त्यांनी येथे दिले.
गालबोट लावणाºयांची गय करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:06 PM
दादा भुसे : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक
ठळक मुद्देलोकसहभाग महत्त्वाचा! स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने मनपातर्फे नियोजन करून विविध कार्यक्रमांवर भर दिला जात असल्याचे महापौर कल्पना महाले यांनी सांगितले. तर हे अभियानाचे महत्व तरुणांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंउद्या पांझरा नदीत स्वच्छता मोहीम धुळे शहराला शासनाने हगणदारीमुक्त घोषीत केले आहे. तत्पूर्वी मनपाने शहरातील ४४ ठिकाणे ही हगणदारी असलेली ठिकाणे निश्चित केली होती. त्यानंतर पथकांची नियुक्ती करून या ठिकाणांवर उघघड्यावर शौचास बसणाºयांवर दंडात्मक कार्यवाही करणउल्लेखनीय कार्य करणाºयांचा सत्कार यावेळी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सफाई कर्मचारी व अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यात मुकादम- लोटन धोंडू सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण हंसराज पाटील, चंद्रकांत नथ्थू जाधव, वासिद असिफ पठाण