शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मानवाच्या कल्याणासाठी जादूटोणा कायदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:30 PM

तानाजी शिंदे : आरावे येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : जादूटोणा कायदा हा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून मानवाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून या कायद्याचा वापर केल्यास अनेक भोंदूबाबा गजाआड होतील, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीच्या कार्यक्रमात राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केले. तालुक्यातील आरावे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अंधश्रद्धा ही देशास लागलेली कीड असून सुशिक्षित लोकही अंधश्रद्धा बाळगत असल्यामुळे भोंदूबाबांचे फावते. त्यामुळे भोंदूबाबांचे पितळ उघडे पाडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व समाज अंधश्रद्धा मुक्त करा, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. अंगात येणे खोटे आहे. त्यांच्या अंगात इतिहासात होऊन गेलेल्या थोर व्यक्ती का येत नाहीत, असा अंतर्मुख करणारा प्रश्नही उपस्थित केला.सप्रयोग व्याख्यान असल्याने त्यांनी रुमालाची काठी कशी तयार होते, वस्तू कशी गायब होते, दुधाने भरलेला ग्लास दूध पिल्यानंतरही रिकामाच कसा होत नाही, फाशीतून सुटका, दोरी जोडणे, पत्ते ओळखणे, पत्ते मोठे करणे, बाहुली नाचवणे, निर्जीव वस्तू हलवणे, नाकातून पाणी काढणे ह्यासारखे अचंबित करणारे भरपूर प्रयोग दाखवले व त्यानंतर त्यामागील विज्ञानही सांगितले. विंचू कसा उतरवतात, गाई-म्हशीचे दूध परत कसे आणले जाते, काविळ कसा उतरवला जातो ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांनी आरावे जि.प. शाळेचे कौतुकही केले कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तानाजी शिंदे यांचा सत्कार सरपंच श्री कैलास गिरासे व मुख्याध्यापक पूना नगराळे यांनी केला.कार्यक्रमासाठी गावातील तरुण वृध्द व बाळगोपाळांनी गर्दी केली होती,कार्यक्रमानंतर सर्वांच्या चेहरयावर हसू होते, अत्यंत विनोदी शैलीत तानाजी शिंदे यांनी  जादूमागील गुपिते व विज्ञान समजून सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भटेसिंग गिरासे हे होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडित पाटील यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी भगवानसिंग गिरासे, अरुण परदेशी, मंगला पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे