शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

टायर नसल्याने रुग्णवाहिका पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:07 PM

चिमठाणे आरोग्य केंद्र : अनेकवेळा तक्रारी करुनही समस्यांची पूर्तता होत नाही

चिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध समस्या असून केंद्रास देण्यात आलेल्या रुग्णवाहीकेचे टायर गेल्या सात-आठ महिन्यापासून जीर्ण झाले असून यामुळे वाहनाचा रुग्णांसाठी उपयोग होत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार करुनही जिल्हा परिषदेकडून दखल घेतली गेलेली नाही.चिमठाणे आरोग्य केंद्रास २० ते २५ गावे जोडली गेली आहेत. मात्र सद्यस्थितीत चिमठाणे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेचे जीर्ण टायर वापरून गरज भागवत आहे.चिमठाणे गावाला लागूनच शिंदखेडा तालुक्याचे ठिकाण असूनही अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. याकडे पूर्णपणे दुर्लक्षच असल्याचे स्पष्ट दिसून येते. या मुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. परिसरातील रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध होत नाही व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आरोग्य केंद्रातील जुन्या रुग्णवाहीकेवर उपाय योजना करावी, अशी मागणी चिमठाणे परिसरातून केली जात आहे. ८-९ महिन्यापासून टायरची भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून अजून किती दिवस यासाठी प्रतिक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये वेळेवर डिझेल नसते तर कधी गाडी खराब होते. अश्या प्रकारची अनेक कारणे दाखवली जातात व अशा वेळी अपघात झालेला व्यक्ती जीवास मुकतो. असा मनमानी कारभार आरोग्य केंद्रात नेहमीच असतो.तसेच आरोग्य केंद्रात असलेले अधिकारी हे रात्री उपलब्ध होत नाही. सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण होत आहेत. यामुळे परिसरातील आरोग्य केंद्राशी जोडलेल्या २० ते २५ गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका वेळेत पोहचत नसल्याने रुग्णास कसे न्यावे असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. जिल्हा परिषदेकडून मिळणारे टायर कधी उपलब्ध केले जातील, अशी चर्चा गावात केली जात आहे.चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकांना दुजा भाव केल्याचे कृत्य देखील समोर आले असून अशा अनेक गोष्टींची दखल या अगोदर देखील ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली आहे. चिमठाणे आरोग्य केंद्रास देण्यात आलेल्या रुग्णवाहीकेस त्वरित टायर उपलब्ध करुन सदरची रुग्णवाहीका अद्यावत करावी, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे