धुळे : महिलेचा विहिरीत अचानक पडून मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील विजापूर गावात शुक्रवारी घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सारजाबाई गोरख शिंदे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. साक्री तालुक्यातील विजापूर येथील सारजाबाई गोरख शिंदे ही महिला ज्योतिराम भागा सूळ यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. विहिरीतून पाणी भरत असतानाच तिचा पाय घसरून तिचा तोल गेला. ती थेट विहिरीत जाऊन पडली.
विहिरीत पडताच मोठ्याने आवाज झाला. विहिरीत काेण पडले, हे पाण्यासाठी तिचा चुलत भाऊ विठ्ठल बारकू सूळ, भाऊ बापू सूळ यांच्यासह परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता महिला पाण्यात पडल्याचे दिसून आले. तातडीने तिला बाहेर काढून साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला तपासून डॉक्टरांनी मृत घाेषित केले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.