प्रशासनाला निवेदन : कोळवले नगरात प्रस्तावित दारू दुकानाचे बांधकाम तोडले
धुळे,दि.13- सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगत असलेली दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याने बंद झालेले एक दारू दुकान कोळवले नगरात स्थलांतरीत होत असून ते त्याठिकाणी होऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सतिष महाले यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली़ तत्पूर्वी महाले यांच्यासह परिसरातील नागरिक व महिलांनी संबंधित दारू दुकानाचे बांधकाम तोडण्याचा प्रयत्न केला़
शहरातील कोळवले नगर, सहजीवन नगर, समतानगर, भोलेबाबा नगर, दुधडेअरी परिसरातील नागरिकांनी गुरूवारी शिवसेना महानगरप्रमुख व संबंधित परिसराचे नगरसेवक सतिष महाले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केल़े राज्य मार्गावरील दारू विक्रीची दुकाने व परमिट रूम रहिवासी क्षेत्रात स्थलांतरीत होण्याची प्रक्रिया सुरू आह़े त्यानुषंगाने कोळवले नगरातील प्लॉट नं 55, कोळवले उद्यानासमोरील जागेत एक दारू दुकान स्थलांतरीत होत आह़े
कोळवले उद्यानात दिवसभर नागरिक व परिसरतील लहान मुले येत असतात़ त्याचप्रमाणे गुरूव्दाराचे मागील बाजूस असलेल्या सेंट अॅन्स स्कुल, निम्स शैक्षणिक संस्था यांच्या विद्याथ्र्याच्या वापरासाठी हा परिसर एकमेव मार्ग आह़े त्याचप्रमाणे प्रस्तावित दारू दुकानालगतच जागृत देवस्थान म्हणून साईबाबा मंदीर आहे तर दुस:या बाजूला महादेवाचे व त्यापुढे नवनाथ मंदीर आह़े
सदर परिसरात दारू दुकानास परवानगी मिळाल्यास दारू पिणारे लोक उद्यानात येऊन दारू पिण्यास मागेपुढे पाहणार नाहीत़ त्यामुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आह़े तरी या परिसरात दारू दुकानास परवानगी देण्यात येऊ नये अन्यथा संघर्ष समिती स्थापन करून आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल, असे निवेदनात नमुद आह़े सदरचे निवेदन उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना सादर करण्यात आल़े यावेळी सतिष महाले, शेखर शर्मा, मनोज वाघ, शिवप्रसाद डेरे, सारीका अग्रवाल यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.