साक्री : साक्री तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाचे प्रवेशद्वार हे धूम्रपान व लघुशंकेचे ठिकाण झाल्याने कृषी कार्यालयात येणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी कृषी विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी साक्री पोलिसांकडे केली आहे.तालुका कृषि कार्यालय कृषी चिकित्सालय हे राष्ट्रीय महामार्गालगत आहे. या कार्यालयात जाणाºया प्रवेशद्वाराजवळ चहाची टपरी असल्याने तसेच बाजूला हॉटेल असल्याने या ठिकाणी अवैधपणे वाहने उभी केली जातात.त्यामुळे कार्यालयात येणाºया शेतकरी महिला तसेच अधिकाऱ्यांना महामार्गावरच आपल्या गाड्या घेऊन थांबावे लागते. खाली उतरून अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकींना बाजूला करावे लागते, तेव्हा कुठे रस्ता मोकळा होतो. याठिकाणी चहा प्यायला येणारे प्रवेशद्वाराजवळच धूम्रपान करत असतात. तसेच रस्त्यावर लघुशंका करत असतात. कृषी कार्यालयात अनेक महिला कर्मचारी आहेत. तसेच कृषी चिकित्सालयामध्ये महिला मजूर दररोज येत असतात. यावेळेस धूम्रपान करणारे रस्त्याच्या कडेला लघुशंका करीत असतात. यामुळे महिलांना येणे-जाणे कठीण झाले आहे. महिलांना काही वेळ बाजूला कुठेतरी थांबावे लागते. रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच सर्वत्र दुचाकी लावलेल्या असतात.यामुळे त्या ठिकाणी येणाºया जाणाºयांना मोठी अडचण सहन करावी लागते. संबंधित दुचाकीधारकांना कोणी बोलायला गेले तर दादागिरी दाखवली जाते, यासंदर्भात यापूवीर्ही साक्री पोलिसांना पत्रान्वये ही समस्या कळवण्यात आली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.यासंदर्भात महिला कर्मचाºयांनी पुन्हा तालुका कृषी अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर तालुका कृषी कार्यालयातील सर्व कर्मचाºयांनी एक संयुक्त निवेदन तयार करून साक्री पोलीस स्टेशन, तहसीलदार व साक्री नगर पंचायतला दिलेले आहे. याठिकाणाहून त्वरित चहाची टपरी हटवावी. तसेच कृषी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धूम्रपान करणारे, लघुशंका करणाºयांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महिलांची पोलिसांकडे कैफियत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:07 PM