लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : केंद्रशासनाने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीने २१ रोजी कामकाज बंद आंदोलन केले़शासनाने ५ जून २०२० रोजी जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात व बाजार समितीच्या कर्मचाºयांना शासन सेवेत घेण्याबाबत राज्य बाजार समिती संघ,पुणे यांच्या आदेशानुसार २१ रोजी महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या व कर्मचाºयांनी एक दिवसाचा संप केला़केंद्रशासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये बाजार समित्यांचा कायदा अस्तित्वात राहील़ मात्र, त्या अंतर्गत येणाºया आवाराबाहेरील शेतमाल खरेदी-विक्री नियमन मुक्त केलेली आहे़ त्यामुळे आवाराबाहेर होणाºया शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर सेस मिळणार नाही़ बाजार समित्यांच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत मार्केट फी असून त्या व्यतिरिक्त बाजार समित्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा अर्थसहाय्य मिळत नाही़ मार्केट फीच्या उत्पन्नातून शेतकºयांना मुलभूत सुविधा, देखरेख, वीज, पाणी, गोडावून, शेड, वजनकाटे, कर्मचाºयांना पगार, भत्ते आदी खर्च भागवावा लागतो़ मात्र, या अध्यादेशाने आवाराबाहेरील खरेदी-विक्री नियमन मुक्त केल्यामुळे सेस मिळणार नाही़ बाजार समित्यांना मिळणारे उत्पन्न बंद होईल़ मार्केट कमिट्या डबघाईस येतील, मार्केट कमिट्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे बाजार समितीचे म्हणणे आहे.५ जूनच्या शासन आदेशास विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील बाजार समित्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला़ २१ रोजीच्या या संपात बाजार समितीच्या गेटजवळ अध्यादेशाविरूध्द घोषणा देण्यात आल्यात़ येथील मार्केट समितीतील कर्मचाºयांनी १०० टक्के संपात सहभाग नोंदविला़ यावेळी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, तसेच संचालक, कर्मचारी, व्यापारी, हमाल मापाडी उपस्थित होते़
शासन अध्यादेशाविरोधात कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 5:08 PM