लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील शिंगावे ते बोरगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. या रस्ता कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.गेल्या दहा वर्षापासून शिंगावे ते बोरगांव रस्ता खड्डेमय झाला होता. मात्र, २०१८ साली या रस्त्याची मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत कामाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण रस्त्याच्या कामाचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील रस्ता तयार झाला नसून अत्यंत निष्कृट दर्जाचे काम या रस्त्याचे सुरु आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत वारंवार सांगून देखील याबाबत कुठलीच कारवाई केली जात नसल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले होते. पंचायत समिती सदस्य जगतसिंग राजपूत, भरत पाटील, मिलींद पाटील, अमोल राजपूत आदींनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या.बोरगाव गावाजवळ रस्त्याचे काम सुरु होते. मात्र, तेथे बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूला साईडपट्टीवर पिवळी माती टाकण्यात येत होती. याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळाली, त्या जागेवर तात्काळ जावून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाला थांबविण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे संबंधित अधिकाºयांना कामाच्या ठिकाणी बोलविण्यात आले. वारंवार रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याबाबत तक्रारी करून देखील याबाबत दखल का घेतली गेली नाही, याबाबत संबंधित अधिकारी यांना संतप्त ग्रामस्थांकडून जाब विचारण्यात आला. संबंधित ठेकेदाराला घटनास्थळी बोलविण्यात आले. मात्र तरी देखील ठेकेदार घटनास्थळी पोहचला नाही. यामुळे संबंधित अधिकाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिकारींंनी ठेकेदाराला बोलवून देखील ठेकेदार आले नसल्याने संपूर्ण ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत होते. अखेर सुरु असलेल्या कामाला ग्रामस्थांनी विरोध करत काम बंद पाडले. जोपर्यंत कामाची योग्य चौकशी केली जात नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाहीत, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. तेथील काम करणाºया मजूरांना देखील परत पाठवण्यात आले व संबंधित अधिकारींंना निवेदन देण्यात आले.कामाची मुदत संपली असून रस्त्याच्या तक्रारीबाबत संबंधित क्वॉलीटी कंट्रोल विभागाला तक्रार केली आहे, असे संबंधित अधिकाºयांनी ग्रामस्थांना सांगितले. वारंवार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकारींंनी देखील या रस्त्याचे योग्य काम करण्यात यावे, याबाबत लेखी तक्रारी ठेकेदाराला दिल्या आहेत, असे संबंधित अधिकारी संदिप पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले. याबाबत योग्य चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, तो पर्यंत रस्त्याचे काम बंद अवस्थेत असू द्यावे, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
निकृष्ट दर्जामुळे बंद पाडले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:19 PM