धुळे : मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना मंगळवारी धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता़ सदर घटनेचा निषेध करण्यासाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे बुधवारी दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आल़े यादरम्यान जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आल़ेमनपाशेजारी असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे अनधिकृत बांधकाम काढून घेणेबाबत व पर्यायी जागा मिळावी या मागणी साठी अध्ययन केंद्राचे पदाधिकारी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्या भेटीला आले होत़े त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकी दरम्यान अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़ धिवरे यांनी आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले होत़े याप्रकरणी रात्री शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सदर घटनेविरोधात महापालिका कर्मचारी समन्वय समितीतर्फे बुधवारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आल़े सकाळी 11 वाजता मनपा आवारात कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व विभागाचे कर्मचारी जमल़े त्यावेळी आयुक्तांना धमकी देणा:यांचा निषेध करण्यात आला़ महापौर कल्पना महाले यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला़ त्यानंतर कर्मचारी समन्वय समितीने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन सादर केल़े आयुक्तांना धमकी देणा:यांवर कारवाई करावी, दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा, अधिकारी व कर्मचा:यांना संरक्षण देण्यात यावे या मागण्या समितीतर्फे करण्यात आल्या़ त्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळर्पयत धरणे आंदोलनही करण्यात आल़े यावेळी कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव, सचिव भानुदास बगदे व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत़े सदर काम बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आल़े
मनपा कर्मचा:यांचे काम बंद आंदोलन!
By admin | Published: January 11, 2017 11:42 PM