कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा धुळे प्रकल्प संचालक शांताराम मालपुरे यांच्यासोबत कृषिभूषण प्रगतीशील शेतकरी ॲड. प्रकाश पाटील, सेंद्रीय शेती उत्पादक कृषी भूषण दिलीप पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.दिनेश नांद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमात कोवीड १९ च्या परिस्थितीमध्ये कृषी विज्ञान केंद्र राबिवत असलेल्या उपक्रमाविषयी यामध्ये पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्र उपस्थितांना दाखविण्यात आले यात एकूण प्रमुख २० विविध पिकांचे ५६ वाणांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
उस पिकाचे २६५ वाण - आपल्या अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर यांनी सांगितले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने तयार केलेल्या ऊस पिकाचे २६५ वाणाद्वारे शेतकऱ्यांना ४० हजार कोटींचा फायदा झाला. तसेच डाळिंब, भगवा, आरका, मृदुला वाणापासून २१ हजार कोटीचा फायदा झाला आहे. सर्व प्रगतीशील शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतावर अवलंब केल्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित कडू आणि आभार प्रा.श्रीधर देसले यांनी केले.