लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कृषी विज्ञान केंद्रातर्फे तालुक्यातील न्याहळोद येथे भेंडी पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रोहीत कडू, जगदीश काथेपुरी व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविक करतांना जगदीश काथेपुरी यांनी भेडी फुले विमुक्ता या वाणाचा प्रात्याक्षिकाचा उद्देश स्पष्ट केला. भेंडी पीक कमी कालावधीमध्ये उत्पादन देणारे असून, या पिकापासून प्राप्त होणारे आर्थिक स्त्रोत याविषयी माहिती लिदी. शेतकºयांनी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रावर भेंडी किंवा इतर लवकर येणाºया भाजीपाल्याची लागवड केल्यास शेतकºयांना निश्चित फायदा होऊ शकतो.तांत्रिक सत्रामध्ये रोहीत कडू यांनी भेंडी पिकाच्या लागवड व्यवस्थापनाची माहिती दिली. ते म्हणाले अझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणाºया जीवाणुंच्या बीज प्रक्रियेमुळे जमिनीतील नत्र व स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होत असते. फुले विमुक्ता हा वाण विषाणूजन्य रोगास प्रतिकारक असून, या वाणाची वेळेत तोडणी केल्यास चांगला बाजारभाव मिळू शकतो. कार्यशाळेला प्रगतीशील शेतकरी कैलास पाटील, रामकृष्ण जिरे, हिंमत बोरसे, सरपंच मुकेश पवार, रमेश शिंदे, जीवन राणे, आदी उपस्थित होते.