आॅनलाइन लोकमतधुळे : कुटुंबव्यवस्थेत ज्येष्ठ नागरिक हे आधारवड असतात. प्रत्येक कुटुंबाने परिवारातील जेष्ठांची सेवा करणे, तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य व आरोग्याची काळजी घेत त्यांचा आदर केला पाहिजे. कारण त्यांचे मार्गदर्शन नेहमी कुटुंबातील सदस्यांना लाभत असते त्यामुळे योग्य निर्णय घेता येतात असे प्रतिपादन जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ.अरुण साळुंके यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव व झेड.बी.पाटील महाविद्यालतील अंतर्गत सुधार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक : कुटुंबव्यवस्थेची गरज’ या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.साळुंके यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे प्रमोद पाटील, संस्थेचे सचिव प्रदीप भदाणे, संचालिका स्मिता साळुंखे, डॉ. निलिमा पाटील, डॉ.योगेश सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.ए.पाटील, आदी उपस्थित होते.स्कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक कायदे’ या विषयावर यशदा पुणेचे समुपदेशक डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली.या सत्राचे अध्यक्षस्थान जिजामाता महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा प्रा.उषा पाटील होत्या.दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांनी त्याचे स्वताचे अनुभव व समस्या कथन केले. याचे विश्लेषण करतांना मानसशास्त्रीय समुपदेशक सोनाली खलाणे यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबशी समायोजन साधण्याचा प्रयत्न केल्यास कुटुंबात विसंवाद ऐवजी सुसंवाद घडेल. सत्राच्या अध्यक्षा स्मिता साळुंखे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या पिढीला समजून घेतल्यास कुटुंबात ज्येष्ठांप्रती आदर वाढेल असे सांगितले.तिसऱ्या सत्रात ‘कौटुंबिक ताण-तणाव’ या विषयावर डॉ.नीरज देव (जळगाव) यांनी वृद्धत्वाची संकल्पना, प्रकार, समस्या,आरोग्य व कौटुंबिक ताण-तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले. अध्यक्षा मा.डॉ.शशिकला पवार यांनी कुटुंबातील ताण-तणाव कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी इतरांवर अवलंबून राहण्याएवजी स्वत: कार्यशील राहून छंद जोपासून स्वत:ला आनंदी ठेवावे असे सांगितले.कार्यशाळेचा सामारोप प्रसंगी डॉ. निलिमा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबातील स्थान अत्यंत महत्वपूर्ण असून त्यांच्यामुळे संस्कारक्षम पिढी घडते. कौटुंबिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी वाचण्याची आवड असावी व टी.व्ही.वरील आनंद देणाºया मालिका बघितल्या पाहिजेत असे सांगीतले. यावेळी प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यशाळेत ९८ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील यांनी तर सुत्रसंचालन प्रा.डॉ.वर्षा पाटील यांनी केले.कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक, आदींनी परिश्रम घेतले.
धुळे येथील झेड.बी.पाटील महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 5:32 PM
९८ ज्येष्ठ नागरिक सहभागी, विविध विषयांवर झाली चर्चा
ठळक मुद्देप्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन शहरातील ९८ ज्येष्ठ नागरिक सहभागविविध विषयांवर चर्चा