लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देशची कुलस्वामिनी माता एकवीरादेवी मंदिरात रविवारी चौथ्या माळेला सकाळी ११ वाजता १०१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. मारवाडी युवा मंच व अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशी आहे अख्यायिकारविवारी चौथी माळ व ललित पंचमी होती. या दिवशी औचित्य आदिशक्तीला बाल्य रूपात पाहिले जाते. त्यामुळे २ ते ९ वर्षाआतील कुमारिकांचे पूजन करण्याची परंपरा आहे. हा उपक्रम शहरातील मारवाडी युवा मंच व अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कुमारिका पूजन सुरू असताना त्यांच्या अंगावर काटे आल्यासारखे वाटले तर आई एकवीरादेवीचा आशीर्वाद आहे, असे मानले जाते.कुमारिकांना दिला महाप्रसाद कुमारिका पूजन झाल्यानंतर मंदिरात उपस्थित १०१ कुमारिकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी आरती झाली. मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी मधुकर गुरव, मनोहर गुरव, सदाशिव पुजारी, चंद्रशेखर गुरव आदी उपस्थित होते. गर्दीने फुलला मंदिर परिसर रविवारी सुट्टीचे औचित्य साधून पहाटेपासूनच मंदिरात गर्दी दिसून आली. शहरातील अनेक भाविक पदयात्रा करत मंदिरात दर्शनासाठी आले. सकाळी नऊ वाजता आदिशक्तीच्या गाभाºयात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसर फुलल्याचे चित्र दिसून आले. आज दिवसभरातही गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविकांनीही दर्शन घेतल्याची माहिती मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसरात लखलखाट खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघालेला दिसत आहे. याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदिरालाही केलेल्या रोषणाईमुळे मंदिर परिसरात लखलखाट दिसत आहे. यानिमित्ताने येथे दाखल झालेले पाळणे, रेल्वे, मिकी माऊस, वॉटर टॅँक लहान मुलांचे लक्ष वेधत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.
एकवीरादेवी मंदिरात कुमारीकांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:12 PM
ललिता पंचमी : मारवाडी युवा मंच, अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे आयोजन; १०१ कुमारिका उपस्थित
ठळक मुद्देनवरात्रोत्सवानिमित्त २८ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत होम, हवन नवचंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर २९ रोजी सुविसीनी पूजनाचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नवरात्रोत्सवानिमित्त मालेगावरोडवरील समर्थ वाग्देवता मंदिरात शनिवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रम झाला. यावेळी सहभागी महिलांनी स्त्री सुक्त पठण केले. यानंतर देवीची आरती व भजनांचाही कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जयश्री चितळे, शैलजा बदर्शनासाठी येणाºया महिला व भाविकांचे मौल्यवान दागिने चोरी होऊ नये, म्हणून २४ तास मंदिर परिसरात पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. मंदिराच्या चारही बाजुना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात पोलिसांची एक तुकडी तर मंदिराच्या बाहेर ठि