धुळे : तालुक्यातील तिखी शिवारातील जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला़ पोलिसांना रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटर आत जंगलात पायी जाऊन हा मृतदेह ताब्यात घ्यावा लागला. यामागे काही घातपात तर नाही ना, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेची मोहाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.तिखीच्या जंगलात डेडरगाव तलाव परिसरात गुरख्याला ६ एप्रिल रोजी सकाळी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती तिखीचे पोलीस पोलीस पाटील शेनु शंकर जोशी यांना दिली. त्यांनी दुरध्वनीवरुन मोहीडी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ त्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह कर्मचारी सकाळी दहा वाजता घटनास्थळी पोहचले. झाडाच्या फांदीला एक अनोळखी पुरूषाचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला़ मृतकाच्या अंगात पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट घातलेली होती़ बाजुला चप्पलही आढळून आली़ याबाबत पोलीस पाटील शेनु जोशी यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक गवई करीत आहेत़ नमुने राखीव, तपासणीला पाठविणारअनोळखी मृतकाचे वय ४५ वर्ष असून त्याचा दोन ते तीन दिवसांपुर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे़ पोलिसांनी मृतदेह हा शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ठेवला आहे़ तो कोण आहे, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, मृतकाच्या मृतदेहाचे नमुने डीएनए चाचणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली़
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कुजलेला मृतदेह
By admin | Published: April 07, 2017 1:19 AM