धुळे : जिल्हाभरातील श्री दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड नाम जप यज्ञ, श्री गुरूचरित्र पारायण, अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ११ रोजी खर्दे, दत्तवायपूर येथे तर १२ रोजी भरवाडे येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.खर्दे येथे आज यात्राउंटावद- शिरपूर तालुक्यातील गुजर खर्दे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त ११ रोजी श्री दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीचा पालखी सोहळा व यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री दत्तांची मुर्ती एकमुखी असून मंदिर ३०० वर्षापूर्वीचे आहे़ पहाटे श्रीमद् भगवद्गीता पारायण, मूर्तीस मंगलस्रान, आरती, भजनाने यात्रोत्सवास सुरूवात होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा साजरा होणार आहे. यावेळी भाविक गुलालाची उधळण करीत पुष्पवृष्टी करतात.यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात खेळणी, संसारोपयोगी साहित्य, विविध खाद्य पदार्थासह मिठाईची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. मनोरंजनासाठी आकाश पाळणेही दाखल झाले आहेत.सायंकाळी चार वाजता परंपरागत पध्दतीने गावातून तगतराव मिरवणूक काढण्यात येणार आहे. मनोरंजनासाठी रात्री शालीक शांताराम यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन व यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष लोटन वंजी गुजर, डॉ.नरेश रघुनाथ चौधरी, पोलिस पाटील जगन्नाथ हिरजी गुजर, रविंंद्र गुजर, चंद्रकांत चौधरी, सरपंच सविताबाई काशिनाथ गुजर, उपसरपंच नितिन ब्रिजलाल चौधरी आदींनी केले आहे.भरवाडे येथे उद्या यात्रोत्सवशिरपूर- तालुक्यातील भरवाडे येथे सालाबादाप्रमाणे श्री दत्त जयंतीनिमित्त ११ रोजी सकाळी ८ वाजता मंगलस्रान, ११ वाजता पंचअवतार उपहार, आरती, दुपारी ३ वाजता दत्तप्रभुंच्या मुर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे़१२ रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करुन गावातून मिरवणूक काढली जाणार आहे़ एकमुखी श्री दत्ताचे जागरुक देवस्थान असल्यामुळे याठिकाणी नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. यात्रेनिमित्त विविध खेळण्यांची दुकाने, हॉटेल, पाळणे, भाड्यांची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. तसेच रात्री लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र श्री दत्तमंदिर भरवाडे येथे भेट देवून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहन बाबुलाल पटेल, सचिव चंपालाल हिरालाल पटेल, ट्रस्टी व ग्रामस्थांनी केले आहे़कुरखळी येथे पारायणशिरपूर- कुरखळी येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त याग, श्री गुरूचरित्र पारायण व कीर्तन कार्यक्रम सुरु आहेत. येथे श्री दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.श्री स्वामी मंदिरात अखंड यज्ञशिरपूर- शहरातील सरस्वती कॉलनीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात ५ ते १२ डिसेंबर दरम्यान अखंड नाम जप यज्ञ कार्यक्रम सुरु आहे़ या सप्ताहातंर्गत ग्रामदेवता निमंत्रण, ध्वजारोहण, सप्ताह पूर्वतयारी, श्री गणेश याग, नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग, गिताईयाग, चंडी याग, रूद्र याग आदी कार्यक्रम घेण्यात आले़ ११ रोजी बली, पूर्णाहूती दुपारी १२़३९ वाजता श्रीदत्त जन्मोत्सव तर १२ रोजी सकाळी १०़३० वाजता सप्ताहाचा समारोप होऊन महाप्रसाद वाटप केला जाणार आहे़या सप्ताहातंर्गत दररोज सकाळी ७़३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, ८ वाजता भूपाळी आरती, ८़३० वाजता श्री गुरूचरित्र वाचन, सकाळी १०़३० वाजता आरतीनंतर विशेष याग, दुपारी २ वाजता दुर्गासप्तशक्ती पाठ वाचन, श्री स्वामी चरित्र वाचन, ६ वाजता औदुंबर प्रदक्षिणा व सांस्कृतिक कार्यक्रम, ६़३० वाजता आरती, सामुदायिक जप तर सायंकाळी ६़५० वाजता श्लोक वाचन, पसायदान, तुकारामांचा अभंग, श्री स्वामी समर्थ मंत्र माळ जप आदी कार्यक्रम होत आहेत़थाळनेर व विखरण केंद्रशिरपूर- थाळनेर व विखरण येथील त्रिकाल आरती केंद्र व वरूळ, भटाणे, वाघाडी, अर्थे, कुरखळी, दहिवद, भाटपुरा, होळनांथे, जापोरा, सांगवी, मांजरोद आणि बभळाज या साप्ताहिक केंद्रावर श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ या सर्व केंद्रावर दररोज श्री गुरूचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सप्तशक्ती पाठ व श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्यात येत आहे़जनता नगरात पारायणशिरपूर- शहरातील जनता नगरातील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात श्री गुरूचरित्र पारायण व अखंड हरिनाम कीर्तन कार्यक्रम सुरु आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री दत्त मंदिर सेवा समितीने केले आहे. शहरातील मारवाडी गल्लीतील श्री दत्त मंदिरासह येथील बसस्थानकावरील श्री दत्त मंदिरातही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़द्वारकाधिश मंदिरातर्फे पालखीधुळे- मोहाडी उपनगरातील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात सालाबादाप्रमाणे श्री दत्त जयंतीनिमित्त ११ रोजी सकाळी ८ वाजता श्री दत्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ १० वाजता ध्वजारोहण, अनुशरण, धर्मसभा होईल़ दुपारी १२ वाजता महाआरती उपहार, नैवेद्य अर्पण होऊन दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे़न्याहळोदला यात्रान्याहळोद- येथील श्री दत्त मंदिरात ११ रोजी जयंतीनिमित्त सकाळी रुद्राभिषेक, पालखी सोहळा, दुपारी महाप्रसाद व रात्री ८ वाजता ह.भ.प. पांडुरंग आवारकर यांचा कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दत्तवायपूर येथे पालखी सोहळादत्तवायपूर- शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी विधीवत पुजनानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात येईल. सायंकाळी साडेपाच वाजता श्री दत्त महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच यावर्षी श्री दत्त महाराज यात्रोत्सवाला १६ डिसेंबर रोजी प्रारंभ होणार आहे.पालखी सोहळ्यासाठी श्री दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आर.पी. पाटील, पूजारी ललित तळेगावकर, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, योगेंद्र पाटील, अॅड.राजेश पाटील, अंबादास पाटील, आनंदा माळी, बापुराव पाटील, शत्रुघ्न पाटील, साहेबराव पाटील, नंदु पाटील, अरूण माळी आदी परिश्रम घेत आहेत.शिंदखेडा येथे श्री दत्त जन्मोत्सवशिंदखेडा- येथील श्री दत्त मंदिरात ११ रोजी जयंतीनिमित्त सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त ५ तारखेपासून दररोज पहाटे ५ ते ८ वाजेपर्यंत श्री गुरुचरित्र पारायण वाचन सुरु आहे. ११ रोजी पारायण समाप्ती, श्री दत्त मूर्ती मंगलस्नान, लघुरुद्राभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७.३० वाजे दरम्यान एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे प्रा.नाना महाराज नरडाणेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनाची सांगता झाल्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव, महाआरती आदी कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापक वासुदेवशास्त्री दीक्षित यांनी केले आहे.श्री गुरुकृपा धाममध्ये कार्यक्रमधुळे- पारोळारोडवरील प.पू.श्री. राघवदास स्वामी राघवानंद सुरदास श्री शरद महाराज ब्रह्मचारी समाधी मंदिरात सप्ताहांतर्गत पहाटे काकडा आरती, सकाळी ७ ते ५ श्री गुरुचरित्र पारायण, सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ व संध्याआरती असे कार्यक्रम सुरु आहेत. ११ रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त सकाळी ७ ते ९ श्री दत्त अभिषेक व समाधी अभिषेक पूजन, १० वाजता हभप सुरेश महाराज फागणेकर यांचे प्रवचन होईल. दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.योग वेदांत समितीतर्फे सत्संगधुळे- येथील चैतन्यधाम संत श्री आसाराम आश्रमात श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे ११ रोजी सकाळी १० वाजता श्री दत्त जयंतीनिमित्त अनुराधा दिदी यांचा सत्संग कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
शिरपूर तालुक्यात खर्दे, भरवाडे येथे यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:21 PM