लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : तालुक्यातील धाडणे गावाजवळ पांझरा नदीच्या पुरात ३५ वर्षीय तरुण रामदास मोरे हा शनिवारी दुपारी वाहून गेला. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथ रविवारी दुपारी भाडणे परिसरात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून शोध मोहिम सुरु झाली आहे.तालुक्यातील पश्चिम पट्टयात गुरुवारी रात्री अतिवृष्टी झाली. त्यामुळे लाटीपाडा धरण हे ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातून विसर्ग होणाºया पाण्यामुळे पांझरा नदीला पूर आला. पुरात शनिवारी दुपारी भाडणे येथील ३५ वर्षीय तरुण रामदास तानकू मोरे (वय ३५) हा पाय घसरुन नदीत पडल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचे नातेवाईक आणि भाडणे ग्रामस्थांनी शोध घेऊनही रविवारी दुपारपर्यंत त्याचा तपास लागला नव्हता. रविवारी दुपारी धुळे राज्य राखीव दलाचे एसडीआरएफ पथक धाडणे येथे दाखल झाले. दलातर्फे भाडणेपासून पांझरा नदीत त्याचा शोध सुरु केला आहे. नदीला अद्याप पूर असल्याने शोध कार्यास वेळ लागत आहे.
पांझरेच्या पुरात तरुण वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:16 PM
साक्री तालुका : भाडणे येथील घटना, शोध सुरु
ठळक मुद्देपुरात तरुण वाहून गेल्याने शोध कार्य सुरुसाक्री तालुक्यातील भाडणे येथील घटना