बायको ऐकून घेत नाही म्हणून वाद
पती-पत्नीमध्ये असलेला विश्वास आणि एकमेकांबद्दल असलेला स्नेह यावरून संसाराची चाके पळत असतात; पण एखाद्या वेळेस असे काही प्रकरण समोर येते की, त्यात पतीला असं वाटत की, पत्नीने आपले ऐकावे आणि मी सांगेल तसं करायला पाहीजे; पण असं काही होत नाही आणि मग सुरू होतो वाद. हा वाद काही वेळेस बंद खोलीत मिटतो तर काही वेळेस पोलीस ठाण्याची पायरी देखील चढतो, असे कितीतरी उदाहरणे आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यात सेल
धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सेल अर्थात भरोसा सेल हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हा सेल पूर्ण क्षमतेने सुरू असतो, तर काही ठिकाणी बोटावर मोजण्याइतक्याच तक्रारी येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पती-पत्नीमधील वाद ही काही नवीन बाब नाही. ज्या ठिकाणी विचार असतात त्याठिकाणी हमखास वाद होत असतात. त्यात काही वेळेस वैचारिकपणा असतो तर काही वेळेस कौटुंबिक कलह देखील असतो. भरोसा सेलमध्ये येणारी प्रकरणांवर सुरुवातीला अभ्यास केला जातो. वादाचे मूळ कारण काय ते शोधून त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न सेलच्या माध्यमातून होत असतो.
- सरिता भांड, भरोसा सेल प्रमुख.
वर्षभरात भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे : ३५४
प्रकरणात घडवून आणला समेट : १३७