आॅनलाइन लोकमतधुळे : बेरोजगारी हटवावी, पोलीस भरती करावी, सर्वच शासकीय परीक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.क्युमाईन क्लबपासून मोर्चास सुरूवात झाली. कमलाबाई कन्या शाळेमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्टÑात बेरोजगारी वाढली असून, तरूणांमध्ये संतापाची लाट आहे. पोलीस व इतर शासकीय जागांच्या रिक्त पदाची भरती होत नसल्याने, तरूणांमध्ये नाराजी आहे. शासनाने तरूणांना नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पोलीस दलात ४० हजार पदाची भरती करावी. पोलीस भरती प्रक्रिया एकाचवेळी सर्व जिल्ह्यात राबविण्यात यावी. शासकीय कार्यलयातील रिक्त जागा भराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. पंकज गोरे, संदीप मुळीक, जीत पाटील, स्वप्नील सोनवणे, प्रमो सोनार, निलेश चौधरी,सोनू गोरे, अमित खंडेलवाल, यांच्या शेकडो तरूण या मोर्चात सहभागी झाले होते.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 7:10 PM
मोर्चात शेकडो तरूणांचा सहभाग
ठळक मुद्देक्युमाईन क्लबपासून मोर्चास सुरूवातमोर्चात शेकडो तरूणांचा सहभागमागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले