नरडाणा : मुंबई-आग्रा महामार्ग लगत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत नरडाणा गावाजवळ नव्याने सुरू झालेल्या वंडर सिमेंट कंपनीत स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यामागणीसाठी सोमवारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले़ नरडाणा औद्योगिक वसाहतीत सुरू झालेल्या वंडर सिमेंट कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कंपनीकडे आधीपासुन करण्यात आली होती़ मात्र संबंधित कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष करून परप्रांतीय युवकांना रोजगार दिला आहे़ स्थानिक युवकांकडे गुणवत्ता असतांनाही त्यांना काम देण्यात आलेले नाही़ रोजगार उपलब्ध करून न दिल्याने परिसरातील संप्तत युवकांनी वंडर सिमेंटकडे जाणाºया रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले़ यावेळी दत्तात्रय दोरिक, संदीप निकम, प्रभाकर दोरीक, सतीश बेहरे, मेलाने येथील विजय बोरसे, मुकेश कोळी, योगेश राणे, कपूर बोरसे चौधरी, अविनाश बेहरे, बोरसे मुकेश, रोहित बोरसे विशाल पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते़
अनेक स्थानिक बेरोजगारांना कंपनीत संधी देण्यात आलेली आहे़ परंतु सद्यस्थितीत कंपनी महिन्यातून तीनच दिवस उत्पादन करीत आहे़ त्यामुळे नव्याने संधी उपलब्ध करून देणे शक्य नाही़ भविष्यात उत्पादन वाढल्यास स्थानिक बेरोजगारांना संधी उपलब्ध होईल़- अशोक पवार, एच़आऱ वंडर कंपनी, नरडाणा