धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य स्त्री सहाय्यक, आरोग्यसेवकांसह वर्ग तीनची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. एवढेच नाही तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वर्ग एकची चार पदे रिक्त असून, या सर्व पदांचा पदभार प्रभारी अधिकाºयांकडे देण्यात आलेला आहे. रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरिब रूग्णांसाठी स्थानिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचाच आधार असतो. त्याठिकाणीच त्यांच्यावर उपचार होत असतात. मात्र ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणाºयांचीच जिल्ह्यात कमतरता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवरच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे.जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी ४१ आरोग्य केंद्र असून, २३२ उपकेंद्र आहेत.जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रासाठी वर्ग तीनची एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ४९० पदे भरण्यात आलेली असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यात आरोग्य सहाय्यक (स्त्री)ची पदोन्नतीची एकूण ४१ पदे मंजूर असून, त्यापैकी २८ भरण्यात आलेली आहेत. तर १३ पद रिक्त आहेत. आरोग्य सेविकांची सर्वाधिक ३९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२१ भरण्यात आलेली असून, तब्बल १७४ पदे रिक्त आहेत.आरोग्य पर्यवेक्षकांची सात पदे मंजूर आहेत. यात सरळ सेवेचे दोन व पदोन्नतीची पाच असे एकूण सात पदे आहेत. त्यापैकी सहा पदे भरण्यात आलेली असून, एकच रिक्त आहे. आरोग्य सहाय्यकाची ५९ पैकी ५३ पदे भरण्यात आलेली असून, सहा रिक्त आहेत. तर आरोग्य सेवकांची (पुरूष, अनुसूचित क्षेत्रातील ७५ पदे नवीन बृहूत आराखड्यानुसार) २७७ पदे मंजूर असतांना १२८ पदे भरण्यात आलेली असून, ९९ पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारीची ४२ पैकी ४० पदे भरण्यात आलेली असून, दोन पदे रिक्त आहेत. तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञची १८ पदे मंजूर असून, १४ भरण्यात आलेली असून, चार पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनातर्फे आॅनलाइन जाहिरातही काढण्यात आलेली आहे. मात्र ही प्रक्रियाही थंड बस्त्यात आहे. आॅनलाइन प्रक्रिया असल्याने, किती अर्ज प्राप्त झाले या विषयी स्थानिकस्तरावर कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कायम चर्चेत असतो़ पूर्वी तर प्रत्येक सभेत हा विभाग सदस्यांच्या समोर असायचा़ तत्कालीन अध्यक्षांनी तर बºयाच वेळा या विभागाला समज दिलेली आहे़ या विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी येते़ असे असूनही या विभागामार्फत जिल्ह्यातील किती प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी, तपासणी केली जाते आणि ग्रामीण जनतेला किती प्रमाणात आरोग्य सुविधा पुरविली जाते हा मुळात प्रश्न आहे़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी याकडे गांभिर्याने बघून आरोग्य सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे़वैद्यकीय अधिकाºयांची ३२ पदे रिक्तग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत असते. जिल्ह्यात गट-अ या प्रवर्गातील वैद्यकीय अधिकाºयांची ७८ पदे मंजूर असतांना केवळ ४६ भरण्यात आलेली असून, ३२ पदे रिक्त आहेत. गट-अ ची ही स्थिती असली तरी गट-ब (बीएएमएस) या प्रवर्गाची स्थिती समाधानकारक आहे. या प्रवर्गातील २८ पैकी २७ पदे भरण्यात आलेली असून, सेवानिवृत्तीमुळे केवळ एक पद रिक्त आहे.लक्ष देण्याची आवश्यकतासध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे टायफाईड, फ्ल्यू, सर्दी,खोकला यासारख्या आजारी रूग्णांची संख्या मोंठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आरोग्य केंद्रातही रूग्णांची गर्दी होत आहे.सर्वच रूग्णांवर उपचार करतांना तेथील कर्मचाºयांवरही ताण येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची गरज आहे. याकडे शासनानेच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
जि.प.चा आरोग्य विभाग सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:51 PM