तब्बल १३ महिन्यांच्या युद्धानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला या लेबनॉनस्थित दहशतवादी गटात अखेर युद्धविराम झाला आहे; पण त्यास एक दिवस उलटत नाही तोच इस्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनवर हल्ला चढविल्यामुळे मध्यपूर्व आशियात कधी तरी शांतता नांदेल की नाही हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. युद्धविराम करारानुसार, हिजबुल्ला लिटानी नदीच्या उत्तरेकडे माघार घेईल, तर हसायली सैन्य लेबनॉन आणि इसावल व गोलन टेकडांना लेबनीनपासून विभक्त करणान्या 'ब्लू लाइन'च्या दक्षिणेपलीकडे निघून जाईल, दोघांदरम्यान केवळ लेबनीनचे सैन्य याच सशस्त्र दलाचे अस्तित्व असेल. दुर्दैवाने युद्धविरामाच्या दुसऱ्याच दिवशी हिजबुल्लावर युद्धविराम शर्तीचा भंग केल्याचा आरोप करीत इस्रायलने किमान सहा ठिकाणी रणगाड्यांनी हल्ला चढविला. परिणामी पुन्हा एकदा युद्धास तोड फुटते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे; परंतु तूर्तास दोन्ही बाजूंची गरज असल्यामुळे, सातखहत का होईना, आणखी काही काळ तरी युद्धविराम जारी राहील, अशी अपेक्षा आहे.
वर्षभरापासून इस्रायल चार आघाड्यांवर युद्ध लढत आहे. गाझ्या पट्टीत हमास, लेबनॉन सीमेवर हिजबुल्ला आणि तांबडवा समुद्रात हुती या दहशतवादी गटांसोबत दोन हात करीत असतानाच, इस्रायल आणि इराणही अधूनमधून एकमेकांवर हल्ले चढवितच आहेत. मुळात हमास काय, हिजबुल्ला काय किंवा हुती विद्रोही काय, त्या सगळ्यांना इराणचेच पाठबळ आहे. मध्यपूर्व आशियातील प्रादेशिक महाशक्ती म्हणून पुढे येण्याची आणि सौदी अरेवियाकडून मुस्लीम जगताचे नेतृत्व हिरातून घेण्याची महत्वाकांक्षा इराण बाळगून आहे. त्यासाठीच विभिन्न दहशतवादी गटांना आर्थिक आणि लष्करी पाठबळ देण्याचे काम इराण सातत्याने करीत आहे. सोबतच इस्रायलसोबत जाणीवपूर्वक शत्रुत्व ओपासत आहे. मध्यपूर्व आशियातील काही मुस्लीम देशांनी इस्रायलसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत, तर सौदी अरेबियासारखा देशही त्या मार्गावर आहे.
या पृष्ठभूमीवर जे मुस्लीम देश इसायलला इसायलला शत्रू क्रमांक एक किंवा 'सैतान मानतात, त्यांचे नेतृत्व स्वत:कडे घेण्याची उत्तम संधी इराणला खुणाठीत आहे आणि त्यासाठीच इराणचे हे सारे उपद्व्याप सुरू आहेत. त्यामुळेच इस्रायलला एका वर्षापेक्षा अधिक काळापासून चार आधाडधांवर युद्ध लढावे लागत आहे. परिणामी नाही म्हटले तरी इसायली सैन्य काहीसे थकले आहे. बऱ्याच सैनिकांचे बळी गेले आहेत आणि बरेचसे सैनिक कायमचे पंगू इहले आहेत. त्यामुळे इसायली सैन्याला पुन्हा एकदा ताजेतवाने होण्यासाठी थोडी उसंत गरजेची झाली होती. त्यासाठीच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविराम प्रस्ताव मान्य केला असावा, अन्यथा लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर इस्रायलमधून विस्थापित झालेल्या ६० हजार इस्रायली नागरिकांना पुन्हा त्या भागात स्थापित करण्याचे, लेबनॉनवर हल्ला चढविण्यामागील त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट काही साध्य झालेले नाही. दुसरीकडे कितीही वल्गना करीत असले तरी, हिजबुल्ला आणि हमारा या दोन्ही दहशतवादी गटांचे कंबरडे मोडले आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही.
अशा प्रकारे उभय बाजूंना पुन्हा एकदा तयारी करण्यासाठी उसंत नितांत गरजेची होती आणि त्या गरजेतून युद्धविराम करार इराला आहे. त्यामुळे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जी बायडेन यांची कितीही इच्छा असली तरी, हा युद्धविराम कायमस्वरूपी होऊ शकत नाही शिवाय युद्धविराम करार झाला आहे तो इस्रायल आणि हिजबुल्लादरम्यान नव्हे, तर इस्रायल आणि लेबनॉनदरम्यान हिजबुल्ला लिटानी नदीच्या दक्षिणेकडे पाच पसरणार नाही, याची जबाबदारी लेबनॉन सरकारवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे सावरण्याची थोडी संधी मिळताच आणि इराणकडून नव्याने शस्त्रास्त्र पुरवठा सुरू होताच, हिजबुल्ला पुन्हा कुरापती सुरू करण्याची पुरेपूर शक्यता आहे. किंबहुना इसायलच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, हिजबुल्लाने त्याची चुणूक दाखवलीही आहे। हमास जास्तच विकलांग इाल्यामुळे इस्रायलला नामोहरम करण्यासाठी इराणही यापुढे हिजबुल्लावरच जास्त विसंबून असेल त्यामुळे इस्रायलला शांतता हवी असल्यास इराणचाच बंदोबस्त करावा लागणार आहे. नेतन्याहू यांनी तसे संकेतही दिले आहेत. लवकरच अमेरिकेची सुझे डोनाल्ड ट्रम्प योच्याकडे येतील. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणमधील विद्यमान राजवट उलथून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे रशिया आणि चीन ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुरेपूर प्रयान करतील त्यामुळे मध्यपूर्व आशियात शांतता हे तूर्त तरी मृगजळच भासत आहे!