हरिहर पांडे, नागपूर
जिथे समुद्रातील आणि खाडीतील मासळीची रेलचेल आहे, अशा कोकण किनारपट्टीवरच्या गावात एक अख्खीच्या अख्खी वाडी वर्षानुवर्षे शाकाहाराचे पालन करते, ही गोष्ट तशी न पटणारीच. पण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कांगवई गावातील गवळवाडीने हा अनोखा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. गेली साधारण ६४ वर्षे हे अनोखे व्रत या वाडीतील प्रत्येक पिढीने जपले आहे आणि अजूनही जपले जात आहे. कदाचित हे कोकणातील एकमेव उदाहरण असावे. प्रत्येक भूभागात सहज उपलब्ध असणारे पदार्थ हे तेथील आहाराचा मुख्य भाग असतात. कोकणाला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने मासे हे कोकणातील बहुतांश लोकांचे मुख्य अन्न आहे.
कोकणाच्या असंख्य वैशिष्ट्यांमध्ये मासे हे इथले वैशिष्ट्य आहे. पण मत्स्याहाराच्या या खवय्येगिरीतही कांगवई गावातील 'गवळवाडी' पूर्णतः शाकाहारी आहे. या वस्तीने आपले 'शुद्ध शाकाहारी पण वर्षानुवर्षे टिकवून ठेवले आहे. निसर्गरम्य वनराई आणि डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील कांगवई गाव. ह समुद्रकिनाऱ्याहून १६ किमी अंतरावर वसलेलं. या गावात मांसाहार, र किंवा मद्यपान केलेच जात नाही. त्यामुळे वाडीत त्याची मत्स्याहार विक्रीही होत नाही. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. चांगल्या समाजासाठी मांस, मासे, दारू सोडणे आवश्यक असल्याचे येथील वयोवृद्ध सांगतात. इतर खेड्याप्रमाणेच येथील बहुतांश युवा मंडळी कामधंदा आणि नोकरीनिमित्त मोठ्या शहरात असूनही आपला हा 'शाकाहार वसा कटाक्षाने जपत आहेत.
'शाकाहारा'वर एकमत बदलत्या काळात मांसाहार आणि व्यसनाधीनतेचा प्रभाव वाढत असताना कांगवईमध्ये अठरापगड जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ते आपापल्या प्रथा-परंपरा पाळतातच; पण त्याचबरोबर शाकाहाराची परंपराही पाळत आहेत. भिन्न विचार अन् भिन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचे एकमत आहे.
चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रभाव २ गावाचा इतिहास सांगताना शांताराम महाडिक व रघुनाथ महागावकर सांगतात की, गावातील गणपत भिकाजी महाडिक यांनी १९५९ साली महानुभाव पंथाचा उपदेश घेतल्यानंतर हा परिसर व्यसनापासून दूर राहावा, यावर भर दिला. त्यांनी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री गीता पाठशाळेचे संचालक बाळकृष्ण म्हस्के (म्हस्के भाऊ) यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांना जगण्याची योग्य दिशा दाखवली. गावातील प्रत्येकावर श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रभाव अजूनही कायम आहे. गवळवाडी सहर्ष स्वागत करीत आहे २ गणपत महाडिक, बाळकृष्ण म्हस्के यांनी महानुभाव पंथाची दीक्षा दादांच्या प्रबोधनामुळे शंभर कुटुंबे असलेल्या घेतली.
बाळकृष्णदादांच्या गवळवाडीत नव्वद कुटुंबांनी महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. ३ गावात २५ मे १९७६ रोजी महानुभाव श्रीकृष्ण ज्ञान मंदिराची स्थापना झाली. बाळकृष्णदादाच्या मार्गदर्शनात दरवर्षी १३ व १४ मे रोजी मंदिराचा वार्षिकोत्सव गेली ४७ वर्षे साजरा केला जातो. महानुभावांचे परमेश्वर अवतार असलेले श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेय प्रभू, श्रीचक्रपाणी महाराज, श्री गोविंदप्रभू आणि श्री चक्रधर स्वामी पाचही अवताराची जयंती गावात उत्साहात साजरी होते,