शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

स्वप्न पेरणारा आमीर पुन्हा गावात येतोय....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 7:16 AM

गावं पाणीदार करून थांबेल तो आमीर कसला? आता गाव समृद्धीसाठी पानी फाउण्डेशन निवडक गावात विशेष प्रकल्प हाती घेत आहे.

प्रगती जाधव-पाटील, उपसंपादक, लोकमत

दुष्काळी भाग पाण्याने सुजलाम केल्यानंतर  आमिर खान आणि सहकाऱ्यांच्या पानी फाउण्डेशनने आणखी खोलवर जाऊन गावचा विकास करण्याचा संकल्प केलाय. यासाठी राज्यातील ९०० गावांची निवडही केली आहे. ही गावं समृद्ध करताना तिथली पर्यावरणीय संवेदनशीलता जपणं, पीक पद्धतीत बदल करणं, शेती पूरक जोडधंदे, स्थानिक वाणांना महत्त्व प्राप्त करून देणं याबरोबरच शेत मालाच्या उत्पादनांवर प्रक्रिया करून ती बाजारात उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित करणं या दिशाही ठरल्या आहेत ! ‘गाव करील ते राव करील का’ या म्हणीचा धागा पकडून राज्यातील दुष्काळी भागातील गावांना पाणीदार होण्याचं स्वप्न आमिर खानने दाखवलं.

सुरुवातीला कोणी याची चेष्टा केली तर कोणाला हा काही दिवसांचा सेलिब्रिटी स्टंट वाटला. रिल आणि रिअल लाईफ मधला फरक समजला की त्याची ही स्वप्नं पुन्हा दुष्काळी भागातल्या पाण्यासारखी ‘हव्वा’ होतील असंही बोललं गेलं. पण खाजगी आयुष्यासह सार्वजनिक आयुष्यातही संवेदनशील असलेल्या आमिरने याकडे दुर्लक्ष केलं. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गटतट बाजूला ठेऊन एकत्र येण्याची साद त्याने घातली आणि गावकऱ्यांची साखळी करत पाणी फाउंडेशनचा विस्तार अवघ्या महाराष्ट्रात झाला. गावं पाणीदार करून थांबेल तो आमीर कसला? आता निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचं काम करण्यासाठी राज्यातील निवडक गावात विशेष काम हाती घेण्यात येणार आहे.

वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या अनेकांच्या पिढ्या तरूणपणी महानगरांत तर म्हातारपणी गावात घालवतात. तरूणपणी कष्ट करून लेकरा बाळांना वाढवायचं अन् लेकरं वाढली की त्यांना मोठ्या शहरात पाठवून आपण गावाकडे मिळेल तसं रहायचं हे चक्र अखंडितपणे सुरूच आहे. एकराने शेती नावावर असली तरीही पाण्याशिवाय त्यात तणच उगवत असल्याने कमालीची हतबलता स्थानिकांमध्ये दिसते. पावसाचं वाहून जाणारं पाणी  धरणे, कालवे या माध्यमातून साठवतांना त्याचा नियोजनबद्ध वापर होणं गरजेचं असतं, याचं भान पाणी फाउंडेशनच्या कामाच्या निमित्ताने पुढे आलं. माथ्यापासून पायथ्यापर्यंतच नाही तर मुळापर्यंत जाण्याची तयारी ठेवत गावकऱ्यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचं ज्ञान पोहोचवून फाउंडेशनने दुष्काळी भाग पाणीदार करण्यात मोठा वाटा उचलला.

दुष्काळ मुक्तीचं स्वप्न बाळगून पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पाणी फाउंडेशनच्या कामाने दुष्काळी भागात अक्षरशा चैतन्य निर्माण केलं. या यशाच्या कौतुकात चिंब होण्यापेक्षा आमिर खानने गावांना अधिक  समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. मृद व जलसंधारण, जल व्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व शेतकऱ्यांचं १ लाख रूपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न. या सहा बाबींवर राज्यातील निवडक गावांमध्ये काम करण्याचं फाउंडेशनने ठरवलंय.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संकल्पित करण्यात आलेल्या विषयांमध्ये सूक्ष्म आराखडे तयार करणं अपेक्षित आहे. निव्वळ पाणी अडवणं महत्त्वाचं नाही, त्या पाण्याचं नियोजन आणि त्याद्वारे पीक पद्धतीची रचना या दोन्ही बाबींकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. सोलापूर, सांगोला, माळशिरस या दुष्काळी पट्ट्यात येणारी ज्वारी, शाळू यांना बाजारात प्रचंड मागणी आणि उत्तम दरही आहे. याच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले गेलं तर त्याचा शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल यात शंकाच नाही. 

स्थानिक वाणांचं मूल्यवर्धन झाल्याने अस्तंगत होणारी वाणंही पुन्हा प्रचलित होतील. दुष्काळी भागात एक पीक पद्धतीचा शिरकाव होऊ नये यासाठी  व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.  स्थानिक भागात येणाऱ्या पिकांकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. गवत वर्गीय वनस्पती जास्त पाणी घेतात. फाउंडेशन जर गवत वाढविण्याचा विचार करत असेल तर त्यामुळे शेतकऱ्यांना पशुपालनाचा जोड व्यवसायही सुरू करण्याची संधी मिळू शकते. पाण्याची धूप होऊ नये यासाठी वृक्ष लागवडीच्या बरोबरीनेच खुरट्या गवतांच्या स्थानिक प्रजातींची लागवड झाली तर झुडपांच्या सावलीने पाण्याची धूप रोखणं सहज शक्य होणार आहे. ओला आणि सुका चारा ही जनावरांची गरज आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या चाऱ्यांचं नियोजन झाले तर पशुपालनाचा व्यवसाय वृद्धिंगत होईल. सुशिक्षित आणि प्रशिक्षित हातांनी सहज साध्य होणाऱ्या सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करून  शेतीमालावर प्रक्रिया झाली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न लाखाची सीमारेषा सहज पार करेल यात शंका नाही. गावं समृद्ध करण्याचा प्रयत्न करताना त्याची मुळं कुठंही हालणार नाहीत आणि बांडगुळं पोसली जाणार नाहीत याचीही खबरदारी घेणं आवश्यक आहे.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानdroughtदुष्काळ