शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा

By किरण अग्रवाल | Published: October 21, 2021 4:00 PM

Accurate observation of excess rainfall is required : अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

- किरण अग्रवाल

 परतीच्या पावसाने केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र दाणादाण उडवून मोठे नुकसान घडविले. या पावसाने होत्याचे नव्हते करून ठेवले. नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुढे जाण्याखेरीज पर्याय नसतो हे खरेच; पण नेहमीच्या होऊन गेलेल्या या संकटात मदतीला धावून जाण्याच्या सरकारच्याही मर्यादा लक्षात घेता, वेळी-अवेळी होणारा पाऊस व अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या यंत्रणांच्या सक्षमपणे उपयोगितेचा यासंबंधाने विचार होणे अपेक्षित आहे.

 कोरोनाच्या संकटात अगोदरच झालेल्या नुकसानीमुळे समाज जीवनावर निराशेचे मळभ दाटलेले असताना पावसाच्या फटक्याने त्यात भर घालून ठेवली आहे. यंदा तसा मान्सून चांगला झाल्याने पिके जोमात होती, त्यामुळे यंदाचा दसरा, दिवाळी चांगली जाईल, असा अंदाज होता. येईन येईन म्हणून भीती बाळगली गेलेली कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात सुदैवाने आतापर्यंत तरी यश आलेले दिसत आहे, त्यामुळेही जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातही चैतन्याचे वातावरण आहे. अशात शेतीपिकेही तरारून आल्याने बळिराजा काहीसा सुखावलेला होता. परंतु, निसर्गाला ते मान्य नसावे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात आलेल्या परतीच्या पावसाने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचलसह अनेक राज्यांत दाणादाण उडविली. दक्षिणेत केरळमध्ये तर हाहाकार उडाला असून, काहीजणांचे बळीही गेले आहेत. महाराष्ट्रातही विशेषता विदर्भ, मराठवाड्याला मोठा फटका बसून गेला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, धान व मक्यासह वेचणीला आलेला कापूस या परतीच्या पावसात जमीनदोस्त झाला. इतरही पिकांची हानी झाली, त्यामुळे बळिराजाच्या डोळ्यात अश्रू तरारले. ऐन सणावाराच्या तोंडावर हे संकट ओढवल्याने, एकातून सुटले आणि दुसऱ्यात अडकले, अशी अवस्था साऱ्यांची झाली आहे.

 नैसर्गिक आपत्तीला इलाज नसतो, त्यामुळे बळिराजावर ओढवलेल्या या संकटातून त्यास काहीसा आधार किंवा दिलासा देण्यासाठी सरकारही आपल्या पातळीवर जमेल ते प्रयत्न करीत आहेच. मात्र, ते पुरेसे ठरू शकत नाहीत. तेव्हा रोगावर इलाज करण्यापेक्षा रोगापासूनच दूर कसे राहता येईल या अंगाने यासंदर्भात विचार होणे गरजेचे ठरले आहे. पाणी, पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या वेधशाळा व हवामान खाते आपल्याकडे आहे, त्यांचे अंदाज कधी खरे, तर कधी खोटेही ठरतात. परंतु, आहेत त्या यंत्रणांचा सक्षमपणे उपयोग होताना दिसत नाही. विशेषतः वातावरणातील बदलामुळे मान्सून पॅटर्न वेगाने बदलतो आहे. तासाभरात एक, एक हजार मिलिमीटर पाऊस पडू लागला आहे. २०१० पासून ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. अगदी चेरापुंजीचे रेकॉर्ड तोडणारा पाऊस अलीकडे महाराष्ट्रात होऊ लागला आहे, तेव्हा या संदर्भातील आधुनिक व अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अंदाज नव्हे, तर सुस्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था होणे अपरिहार्य बनले आहे.

 महत्त्वाचे म्हणजे राज्याला किंवा देशालाच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाला ढगफुटीची आगाऊ माहिती देण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने भारताची नोडल एजन्सी म्हणून निवड केलेली आहे. याकरिता कोट्यवधीचा निधीही उपलब्ध करून दिला जात असतो. तेव्हा ‘एक्स बँड डॉप्लर रडार’ व सुपर कम्प्युटर (HPC) सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध असल्याने त्या यंत्रणेचा वापर करून ‘क्लाऊड बस्ट’ व ‘फ्लॅश फ्लड’ची माहिती मिळविणे व ती स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन संभाव्य नुकसान टाळणे अवघड नाही. दुसरे म्हणजे, मान्सून पॅटर्न बदलत असल्याचे पाहता पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन ''क्राफ्ट पॅटर्न'' बदलाचा विचार करणेही आवश्यक आहे, परंतु याहीसंदर्भात पुरेसे जनजागरण होताना दिसत नाही. कृषी विद्यापीठांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, परंतु ती शिक्षण, संशोधन व विश्लेषणातच अधिकतर व्यस्त असतात. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत व पद्धतीने निसर्गात होत असलेले बदल व त्याप्रमाणे शेतीत करावयाचे बदल समजावून सांगणे गरजेचे झाले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीच्या नापिकीसारख्या समस्या ओढवत आहेत. याहीदृष्टीने बदल केला गेला तर होणारे नुकसान टाळता येऊ शकेल.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस