शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मनाचिये गुंथी - एकारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:55 AM

झाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले.

- किशोर पाठकझाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले. म्हणजे माणसाचे सहज मरणे आणि त्याला मारणे यात केवळ ‘कानाचा’ फरक, पण तो किती कठीण आणि न समजणारा. म्हणजे माणसाला माणूस जगायला हवा, त्याचा विचार जगायला हवा असे वाटते, पण माणूस जगत नाही जगवत नाही. आपल्याला एक इझम चिकटलाय. गंमत म्हणजे तो प्रत्येक माणूस जगायलाच हवा, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित हा घोष करीत राहतो आणि नेमके उलटे वागतो. माणूस जेवढा विविध तेवढे त्याचे विचारही भिन्न. मला जो माणूस माझा वाटतो तो इतरांना जवळचा वाटत नाही. म्हणजे दया, क्षमा, शांती हे शब्द प्रत्येकाला माहीत आहेत, मान्य आहेत परंतु ते तत्त्वज्ञान झाले याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय संबंध? म्हणजे न आवडणारा ठोकायलाच हवा ही आपली प्रवृत्ती. म्हणूनच माणूस जगतो आणि मरतोही. मग आपण एक वाक्य ऐकतो, वाचतो. माणूस मेला तरी विचार मरत नाहीत.गांधी गेले, शास्त्री गेले, जयप्रकाश नारायणही गेले, विनोबा गेले, श्यामच्या आईचे साने गुरुजी गेले काय बदल झाला आपल्यात? कुठल्या वैचारिक प्रचाराने आपण सुधारलो, बदललो. उलट दिवसेंदिवस आपण खूप एकांतिक होत चाललोत. आपण एकारलोत. हे एकारणे कुणाला हवे, कुणाला नको, मग भले त्यात माणूस चिरडला तरी जपायला हवा म्हणणारेही आहेत. याला शिक्षा व्हायलाच हवी. या व्यक्ती समाजात उंच मानेने चालतात, वावरतात आणि स्वयंघोषित संत-महंत तुरुंगात बसतात. कायदा कठीण आहे. तो हवा तेव्हा बदलता येतो किंवा त्याचा हवा तसा अर्थ लावता येतो. हे सोयीस्कर अर्थ लावणे यालाच वैचारिक परिभ्रमण म्हणतात, कुणी क्रांती म्हणतात कुणी आणीबाणी म्हणतात. कुणाला हा मुक्त संचार वाटतो, तर कुणाला मुस्कटदाबी वाटते. असा विचार करणारी माणसं एकमेकांसमोर आली तर काय होईल? मारामारी, दंगल आणि खून! पण हे वैचारिक, सर्वमान्य नाही. माणसांना सरळ खाणारा बिबट्या सापडला तर त्याला घनदाट जंगलात सोडतात. का तर तोही जगायला हवा. पण माणसाला ती मुभा का नाही? तू बोल वा बोलू नको. तू मला हवं ते बोल किंवा बोलूही नको! तुझे जगणे हे वैचारिक धारेत निरुपयोगी असेल तर जग, तू जगायला लायक नाहीतर मरायला तयार हो। खूप मोठ्याने म्हणतो आपण, माणूस मेला तरी चालेल विचार जगायला हवेत. पण मग एकच प्रश्न! जगण्याचा हक्क प्रत्येक माणसाचा, मग माणूस का जगायला नको? हा प्रश्न उत्तरहीन!