महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचा ‘रॅगिंंग’च्या माध्यमातून छळ होत असतो. शिक्षणानिमित्ताने पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यानंतर विद्यार्थीदशेतच अनेकांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागते. त्यातून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. ‘रॅगिंंग’ला पायबंद घालण्यासाठी कायदेशीर उपाययोजना आवश्यक आहे. त्यादिशेने पिंपरी-चिंचवड शहराने पहिले पाऊल टाकले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याकडून ‘अॅन्टीरॅगिंंग फॉर्म’ भरून घेतला जात आहे.बाहेरगावाहून शिक्षणासाठी येऊन वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना सिनिअर्स विद्यार्थ्यांच्या ‘रॅगिंग’ चा त्रास सोसावा लागतो. अनेकदा हे प्रकार शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनापर्यंत येत नाहीत. कोणी विद्यार्थ्याने टोकाची भूमिका घेतली तरच असे प्रकार चव्हाट्यावर येतात. रॅगिंंग कोणत्या स्वरूपाचे आहे, त्यावर हे अवलंबून आहे. लंैगिंंग छळ हा रॅगिंंगचा घृणास्पद प्रकार काही ठिकाणी घडला असल्याचे पुढे आले आहे. काही विद्यार्थी परिस्थितीपुढे हतबल असल्याने नाईलाजास्तव निमूटपणे सर्व सहन करतात. तर काही नैराश्येच्या गर्तेत जातात. ज्यांना सहन होत नाही, ते आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. कायद्याच्या उपाययोजना, जनजागृती मोहीम राबवूनही रॅगिंंगच्या घटना घडत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात तक्रार देण्यास विद्यार्थी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येकाने मी रॅगिंंग करणार नाही, असे स्वत: प्रतिज्ञापत्र (अॅन्टीरॅगिंंग) भरून महाविद्यालयाला सादर करायचे आहे. एका अर्थाने स्वत:च्या वर्तणुकीबद्दलचे ते हमीपत्रच आहे. विद्यार्थी तसेच पालकांना ‘अॅन्टीरॅगिंंग अफिडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील विधी महाविद्यालयांनी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. पाठोपाठ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातही त्याची युद्धपातळीवर अंमलबजावणी होऊ लागली आहे.
‘अॅन्टीरॅगिंग’चे प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:19 PM