शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

Afghanistan Crisis:  ‘तालिबान’ - बेछूट क्रूरकर्म्यांचा उदय कसा झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 8:01 AM

Afghanistan Crisis: ३.५ लाख सैनिकांनी तालिबानसमोर नांगी टाकली आणि अफगाणिस्तान अलगद तालिबानच्या घशात गेला... तालिबान या संघटनेच्या मुळांचा शोध!

- निळू दामले(ज्येष्ठ पत्रकार)

काबूलमधल्या पोलिसांनी आपले गणवेश टाकून दिले आणि नागरी कपडे घालून ते पोलीस कार्यालयांतून बाहेर पडले... ढगळ तुमानी आणि पायघोळ शर्ट घातलेले, खांद्याला उलटी कलाश्निकॉव लटकावलेले तालिब बगिच्यात फिरायला जावं तसे  राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या दालनात शिरले... याची पूर्वकल्पना असल्याने घनी गपचूप सत्ता सोडून ताजिकीस्तानात पळून गेले... काबूलमधल्या अनेक ब्युटी सलोनमध्ये माणसं घुसली आणि तिथं लावलेल्या सौंदर्यवतींच्या फोटोंवर फटाफट रंग फासला गेला... एकाएकी स्त्रिया रस्त्यावरून गायब झाल्या. - अफगाणिस्तानात अवघ्या काही दिवसांत हे सर्व अगदी सहजपणं घडलं. त्यासाठी तालिबानला ना गोळीबार करावा लागला, ना चाबकाचा वापर! ३.५ लाख अफगाण सैनिकांनी तालिबानसमोर नांगी टाकली.

अफगाणिस्तानचं लष्करही ज्यांना टरकतं ते हे तालिबान आहेत तरी कोण?तालिब (विद्यार्थी) या पश्तु एकवचनाचं तालिबान हे बहुवचन. तालिबांची संघटना म्हणजे तालिबान. तालिबान ही रजिस्टर्ड संघटना नाही. तिथं सदस्य नोंदणी नसते. संघटनेच्या अधिकृत बैठका, बैठकीत ठराव असं काही नसतं. तालिबानचा कोणताही लिखित जाहीरनामा नाही. संघटनेचे पदाधिकारी औपचारिक पद्धतीनं निवडले जात नाहीत. एकूणच ही कोणतीही औपचारिक संघटना नाही. नियम, कायदे, शिस्त असं काहीही या संघटनेला लागू नाही. अनौपचारिकरीत्या संघटनेचा प्रमुख म्हणजे अमीर निवडला जातो. निवडला जातो म्हणण्यापेक्षा एक जण अमीर होतो, असं म्हणणं अधिक बरोबर. अमीर जे सांगेल तो नियम, तो कायदा. त्याच्या म्हणण्याला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, विरोध करू शकत नाही. तालिबानला लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य मंजूर नाही.

तालिबानच्या नियमांचा भंग केला तर कोणाही सदस्याचा खून होऊ शकतो, त्याचे हातपाय तोडले जाऊ शकतात. सुनवाई, चौकशी तपासून पाहण्याची पद्धत नाही. अफगाणिस्तानात जसं बर्फ पडतं, बर्फ वितळतं आणि नद्या वाहतात तशी तालिबान ही संघटना आपोआप चालते. ही संघटना १९९६ साली गाजल्यानंतर लोकांच्या लक्षात आली. या संघटनेचा पहिला प्रमुख मुल्ला ओमार. कंदाहारमधल्या संगेसर या गावातल्या एका मदरशात तो वाढला. पुढे तिथेच तो शिकवत असे. १९८५ च्या आसपास अफगाणिस्तानाची सत्ता चालवणाऱ्या रशियाला विरोध करणाऱ्या अनेक मुजाहिद (धर्मसैनिक) गटांपैकी एक गट मुल्ला ओमार चालवत असे. रशियन लोकांबरोबर झालेल्या एका चकमकीत त्याचा एक डोळा गेला होता.

१९९० मध्ये रशियाला हाकलल्यानंतर मुजाहिदांच्या संघटनांमध्ये आपसात मारामारी सुरू झाली. प्रत्येक गटाला अफगाणिस्तानची सत्ता हवी होती. रशियन सरकार कोसळलं; पण त्या जागी पर्यायी सरकार येत नव्हतं, अराजक माजलं होतं. देशात अनावस्था होती, लुटालूट होत होती, जनता हैराण होती. एकदा कंदाहारमध्ये रस्त्यावर लूटमार चालल्याची बातमी ओमारच्या मदरशात पसरली. ओमारनं मदरशातले तालिब गोळा केले, रस्त्यावर पोचला, लुटालूट करणाऱ्यांना बडवलं, व्यवस्था बसवली. या घटनेचा बोलबाला झाला. कुठंही लुटालूट वा गैरव्यवस्थेची बातमी आली की ओमार तालिबांची टोळी घेऊन तिथं पोहोचत असे. रशियाविरोधात गनिमी लढाई करताना तालिबांना बंदुकी मिळाल्या होत्या. त्या बंदुकांचा धाक आणि वापर तालिब करत. आसपासच्या मदरशांतले तालिब सामील झाले.

तालिबांची संख्या वाढली, एक सेनाच तयार झाली. ही सेना देशभर फिरू लागली. असं करत करत १९९६ च्या सुमाराला ओमारनं इतर सर्व मुजाहिद गटांना मागं तरी टाकलं किंवा मारून तरी टाकलं. आणि ओमार यांच्या तालिबानची सत्ता अफगाणिस्तानावर स्थापन झाली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या हद्दीवर, दोन्ही बाजूला जलालुद्दीन हक्कानी या एका मुल्लाचे, मुजाहिद कमांडरचे शेपाचशे मदरसे होते. या मदरशांत दहशतवादी कारवाया, लढाई यांचं प्रशिक्षण दिलं जात असे.  हक्कानी साखळीत तयार झालेले मुजाहिद ओमार यांच्या तालिबानमध्ये सामील झाले. त्यामुळं तालिबान ही संघटना देशव्यापी झाली. मदरशात छोटी मुलं सामील होत असत. कारण गरिबीनं पछाडलेल्या अफगाणिस्तानात मुलगा मदरशात पाठवला की तिथं त्याच्या आयुष्यभराची जेवणाखाण्याची सोय होत असे.

मुल्ला सांगतो ते ऐकायचं. बस. इतकी सोपी कामाची पद्धत. या वातावरणात स्त्रिया दुर्मीळ, म्हणून स्त्रीबद्दल एक तर घृणा किंवा स्त्री ही केवळ लैंगिक सुखासाठी वापरून घ्यायची गोष्ट असा विचार तालिबानमधे प्रचलित झाला. मदरशांत विज्ञान, गणित, इतिहास, भाषा वगैरेंचा संबंध नसे. शरीर, श्रद्धा, आज्ञापालन! बुद्धीचा भाग अनुपस्थित. आज्ञापालन एवढी एकच गोष्ट शिकवलेली. लोकांनी दहा इंच लांबीची दाढी वाढवली पाहिजे, स्त्रीनं शिकता कामा नये, घराबाहेर जाऊन काम करता कामा नये, नवरा-भाऊ-बाप अशा कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय रस्त्यावर फिरता कामा नये. हे नियम न पाळणाऱ्याला चाबकाचे फटके. चोरी केली तर हात तोडून टाकणं. स्त्री कोणाच्या प्रेमात पडली आणि कुटुंबाबाहेर शरीरसंबंध केला तर तिला मारून टाकणं. आदिम प्रकारची शेती, आदिम प्रकारचा व्यापार हीच अर्थव्यवस्था. त्यामुळं उत्पादन व्यवस्था, बँकिंग, कॉलेजेस, विज्ञान इत्यादींची आवश्यकताच नाही. मुल्ला ओमार १९९६ साली सत्ताप्रमुख झाला तेंव्हा त्याच्या घरी असलेल्या पेटाऱ्यांत पैसे साठवलेले असत आणि त्यातून सरकारी नोकर, लष्कर, पोलीस इत्यादींचे पगार होत असत. सरकारी आदेश मुल्ला एका पाठकोऱ्या कागदावर लिहून पाठवत असे.  

या तालिबानची सत्ता अफगाणिस्तानात १९९६ ते २००१ या काळात चालली. ओसामा बिन लादेनला तालिबाननं थारा दिल्यामुळ अमेरिकेची खप्पा मर्जी झाली आणि ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेनं तालिबानचा पाडाव करून एक नवं सरकार स्थापलं. २००१ सालानंतर अमेरिकेची सेना आणि करझाई इत्यादींचं सरकार अफगाणिस्तानात होतं. पण, मोजकी शहरं सोडली तर बाकीच्या अफगाणिस्तानावर तालिबानचीच सत्ता चालत असे. तालिबानचे लोक जनतेकडून कर गोळा करून समांतर कारभार करत. मुल्ला ओमार पाकिस्तानात क्वेट्ट्यात मुक्काम करून ते सरकार चालवत असे. २०१३ साली मरेपर्यंत. गेली पाच-सहा वर्षे तालिबाननं एक ऑफिस दोहामध्ये उघडलं होतं आणि तिथून तालिबान अमेरिकेशी वाटाघाटी करत होतं. म्हणजे तालिबानची अनधिकृत सत्ता अफगाणिस्तानावर होतीच- आता ती अधिकृत झाली एवढंच!

damlenilkanth@gmail.com(उद्या उत्तरार्ध : उर्वरित जग अफगाणिस्तानला मदत करू शकेल का?)

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान