- धर्मराज हल्लाळेतुरीच्या हमीभावाचे त्रांगडे सुरू असतानाच हरभºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सलग तीन-चार वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीनंतर बाजारात शेतमाल आला़ तुरीची १ फेब्रुवारी २०१८ पासून नोंदणी सुरू झाली़ प्रत्यक्षात पहिल्या आठवड्यात खरेदीही सुरू झाली़ परंतु, अजूनही नोंदणी केलेल्या सर्व शेतकºयांची तूर खरेदी झाली नाही़ ज्यांची खरेदी झाली त्यापैकी बहुतांश जणांना पैसे मिळाले, ही समाधानाची बाब़ मात्र अजूनही जिल्हानिहाय कोट्यवधींचे देणे आहे़ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खरेदी सुरू झाली़ परंतु, यंदा तूर खरेदीलाही विलंब झाला़तुरीनंतर आता हरभरा खरेदीचा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे़ हमीभाव ४ हजार ४०० रुपये असला तरी खुल्या बाजारात तो ३२०० रुपयांपर्यंत घसरला होता़ हमीभाव खरेदी केंद्रांकडून मिळणारा भाव आणि खासगी आडत व्यापाºयांकडून मिळणारा भाव यामध्ये हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतची तफावत होती़ त्याचा हरभरा उत्पादक शेतकºयांना फटका सहन करावा लागला़कृषी उत्पन्न बाजार समित्या व नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले़ त्यामुळे शेतकºयांना खासगी बाजारात हरभरा विकण्याची गरज राहणार नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सांगितले़ परंतु, प्रत्यक्षात हरभºयासाठी १ मार्चपासून नोंदणी झाली, ५ मार्चपासून खरेदी सुरू झाली़ एकट्या लातूर जिल्ह्यात २१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली़ त्यातील केवळ ७०० शेतकºयांचा ५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला़ त्याचे सुमारे २ कोटी रुपये थकीत आहेत़ हमीभाव खरेदी केंद्राच्या समोरही अडचणींचा पाढा आहे़ गोदाम उपलब्ध नाहीत़ त्यातच मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने वजन-काटे वाढविता आले नाहीत़ या ना त्या कारणाने हमीभावाची खरेदी नोंदणी पुरतीच राहिली आहे़ अजूनही सर्व शेतकºयांचा हरभरा नोंदणी प्रमाणे खरेदी झाला नाही़ ज्यांचा खरेदी झाला त्यांना पैसे मिळालेले नाहीत़पाऊस वेळेवर येत नाही, तो अवकाळीच बरसतो़ शेतात पिकत नाही, पिकले तर हमीभावाने विकत नाही़ या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कर्जबाजारी होत जातो़ त्यामुळेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव (बो़) येथील शेतकरी भागवत एकुर्गे यांना आपल्या मुलीचा विवाह कसा करायचा हा प्रश्न भेडसावतो़ यंदा पिकले आहे, चांगले पैसे येतील, मुलीचे लग्न करू, असा विचार केलेला शेतकरी पिता अडचणीत आहे़ भागवत एकुर्गे हे एक उदाहरण आहे, ज्यांनी आपले गाºहाणे प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडले़ प्रत्यक्षात असे कैक भागवत आपल्या मुलीच्या विवाहासाठी चिंतित आहेत़भागवत एकुर्गे यांनी खुल्या बाजारात हरभरा विकला तर सुमारे दीड लाखांवर तोटा सहन करावा लागला असता़ त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहाची तारीखच पुढे ढकलली़ २४ एप्रिलचे लग्न आता १२ मे रोजी होणार आहे़ ही व्यथा गावोगावी आहे़ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याची दखल घेऊन या शेतकºयाचा दीडशे क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले़ एकाची एक अडचण मांडली गेली़ ती सोडविण्याचा मंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असे म्हटले तरी गावोगावी असणाºया अन्य शेतकºयांच्या अडचणींचे काय होणार, त्या सोडविणार कशा, हा प्रश्न कायम आहे़ बाजारातल्या तुरीचा हिशेब अर्धवट; हरभºयाचाही हमीभाव हवेत, अशा स्थितीत मराठवाड्यातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा सामना करीत आहेत़
तुरी नंतर हरभऱ्याल्याही हमीभाव हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:06 AM