शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
3
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
4
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
5
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
6
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
7
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
8
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
10
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
11
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
12
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
13
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
15
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
16
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
17
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
19
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
20
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 

पुन्हा तेच ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:05 PM

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. त्यांची नाराजी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत असते. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर दिलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला. परंतु खडसे यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ही महाआघाडी कितपत टिकाव धरेल, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत होती. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार स्वीकारला होता. तर रावेर येथे राजीव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता. ही पार्श्वभूमी पाहता शिवसेनेसोबतच्या महाआघाडीविषयी साशंकता होती आणि तसेच घडले. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे टोकन हाती असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी जाधव यांच्यासाठी काँग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुळात केवळ ७ जागा लढविणाºया काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी हट्ट धरणे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना व राष्टÑवादी हे दोन पक्ष महाआघाडीत उरले आहेत. शिवसेनेने १३ तर राष्टÑवादीने ३ जागा लढविल्या आहेत. जागावाटपावरुन आघाडी तुटल्याने भाजपा नेत्यांना हायसे वाटले आहे. भाजपाची ग्रामपंचायतीत सत्ता होती; खडसे यांचे वर्चस्व कायम असले तरी भाजपाने याठिकाणी गाफिल न राहता चातुर्याचे दर्शन घडविले. प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना अर्ज भरायला सांगून सगळ्याच उमेदवारांचे माघारीचे अर्ज ताब्यात घेतले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करुन उर्वरित उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे बंडखोरी झालेली नाही. शुध्द पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, गटारी या प्रश्नांभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. ४० वर्षांचे राजकारण आणि दोनदा मंत्रिपद आणि एकदा विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या खडसे यांच्या गावात जर मुलभूत समस्या कायम असतील, तर आश्चर्य म्हणावे लागेल. नेत्यांच्या गावातही तेच असेल तर मग समस्या सुटल्या कुठल्या हा प्रश्न आहेच.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव