शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

घड्याळात स्वत:ची वेळ शोधताहेत अजित पवार..

By यदू जोशी | Published: August 09, 2024 10:59 AM

‘आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी’ असे लक्षात आले की ती बदलल्याशिवाय पर्याय नसतो. अजित पवार त्याच प्रक्रियेतून जात आहेत.

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत -

अजित पवार गटाचे काही मंत्री आहेत की, ज्यांना मंत्रालयातील पाच पत्रकारांचीही नावे माहिती नसावीत. याच पक्षाचे दोन-तीन मंत्री असे आहेत की, ते चालताना कोणाकडेही पाहत नाहीत, स्माईल देणे वगैरे तर दूरच राहिले. कायम रूक्ष चेहरा असतो त्यांचा. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांनाही हे मंत्री मोजत नाहीत, त्यांच्या कार्यालयांमध्ये सामान्यांना जागा नसते. कंत्राटदारांची रेलचेल असते. अजितदादा बदलत आहेत; पण त्यांचा हा गुण त्यांचेच मंत्री घेत नाहीत. अजितदादांचे अलीकडची सर्व जॅकेट्स गुलाबी रंगाची आहेत, असे का याचे मजेशीर उत्तर त्यांनीच मध्यंतरी दिले होते. प्रसार माध्यमे, सामान्य माणूस यांच्यापर्यंत न पोहोचलेल्या आणि याच वर्गाच्या सहानुभूतीची गरज असलेल्या पक्षाने अजितदादांची ‘जनसन्मान यात्रा’ सुरू केली आहे.  त्यांनी नेमलेल्या एका पीआर एजन्सीने मध्यंतरी एकेक करून काही ज्येष्ठ पत्रकारांना मंत्रालयाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिवसा बोलावले, कॉफी पाजली आणि ‘विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काय केले पाहिजे’ असा सल्ला विचारला. तेव्हा एरवी रागारागाने पाहणाऱ्याने अचानक खूप लाड करावेत तसे वाटले.  चर्चा सुरू असताना पीआरवाले लॅपटॉपवर नोंदी करून घेत होते, तसे तेदेखील जरा हवेतच वाटले; पण आपण राजकारण करत असताना इतरांना आणि विशेषत: माध्यमांना विचारायचे असते, हे मनात येणे आणि त्यावर अमल करणे, ही किती  मोठी गोष्ट झाली नाही? एवढा आमूलाग्र बदल कसा काय? अजित पवार काय आणि दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ हे वर्षानुवर्षे माध्यमांमधील एका चौकडीपलीकडे गेलेले नाहीत; पण आता त्यांच्या पक्षाला सगळ्यांचीच गरज भासू लागली आहे. मीडियाशी चौफेर संपर्क असलेले प्रफुल्ल पटेल हे एकच नेते या पक्षात आहेत, त्यांच्याच सल्ल्याने आताचे बदल होत असल्याची माहिती आहे.

मुळात आधीचा काय आणि आताचा काय; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची व्याख्या ही ‘आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांचा पक्ष’ अशीच आहे. सध्याची यात्रा ही अजित पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापासून पुढे नेत महाराष्ट्राचे नेते करण्यासाठी आहे. प्रतिमा बदलणे, हा एक भाग असतो, प्रतिमा निर्माण करणे, हा भाग आणखी वेगळा. मात्र, अजित पवार यांच्याबाबत दोन्ही गोष्टी कराव्या लागत आहेत. ‘आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी’ असे लक्षात आले की मग ती बदलल्याशिवाय पर्याय नसतो. अजित पवार सध्या त्या प्रतिमा बदलाच्या प्रक्रियेतून जात आहेत.  मोठे होण्यासाठी नेत्यांना पूर्वी पैसे मोजून एजन्सी नेमाव्या लागत नसत; आता सगळेच एजन्सींचा आधार घेत आहेत. 

काकांनी जन्माला घातलेल्या पक्षाचे ३५-४० आमदार फोडून सरकारमध्ये जाता येते; पण तीन महिन्यांनंतर जनतेत जायचे आहे, त्यामुळे प्रतिमेचा खेळ खेळावा लागत आहे. धाकली पाती सर्वार्थाने मोठी होण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार फोडणे आणि आमदार निवडून आणणे, यात जमीनअस्मानचा फरक आहे. लोकसभेला त्याचा अनुभव आलेला होताच, आता त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे म्हणून ‘जनसन्मान यात्रा’ काढली आहे. भाजपच्या मतदारांनी शिंदेसेनेला स्वीकारले; पण अजित पवारांना नाही, असे चित्र आहे. ते बदलण्याची धडपडदेखील सुरू आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीकडील मुस्लीम, मागासवर्गीयांची मते खेचण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. 

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी महाराष्ट्राचे नेते आहेत, ती मान्यता अजितदादांना अजूनही नाही. एकतर मोठ्या झाडाखाली इतकी वर्षे राहिले, त्यातून बाहेर पडून जेमतेम १३ महिने झाले. व्यापक क्षमता दाखविण्याची संधीच उशिरा मिळाली. देवेंद्र फडणवीसांना पक्ष मोठा करायचा आहे, अजितदादांना स्वत:चे नेतृत्व मोठे करत पक्षही मोठा करायचा आहे, हे आव्हान अधिक मोठे आहे. प्रत्येक माणसाचा एक युनिक सेलिंग पाॅइंट (यूएसपी) असतो. प्रतिमा संवर्धनासाठी जी एजन्सी आणली आहे तिने ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाइन घेतली आहे. अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, दिलेला वादा पूर्ण करतातच हा त्यांचा यूएसपी मांडत त्यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता काकांपेक्षा अधिक वाढविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द नेहमीच पाळणारा हा नेता राष्ट्रवादीच्या घड्याळात आपली स्वत:ची वेळ आणि त्याद्वारे आणखी मोठी संधी शोधत आहे.  

पत्रकार लाडके कधी होतील? लाडकी बहीण, लाडके भाऊ, अशा लाडक्या  योजना आणल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही पत्रकार काही सरकारसाठी लाडके झालेले नाहीत. सरकार दरवर्षी पत्रकारांना पुरस्कार देते. चार वर्षांपासूनचे पुरस्कार अडलेले आहेत. गाजावाजा करून पत्रकारांसाठी सन्मानधन योजना सुरू केली; पण ते पैसे एक तारखेला कधीही मिळत नाही. ‘पैसे नाही’ असे कारण दिले जाते. शेकडो पत्रकारांचे सन्मानधनासाठीचे अर्ज माहिती खात्यात पडून आहेत. सन्मानधन मासिक ११ हजारांवरून २० हजार केल्याचा जीआर निघून सहा महिने झाले; पण अंमलबजावणी नाही. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी हा एक मोठा विनोद आहे. अमूक एक आजार झाला तरच मदत देऊ, अशी विचित्र अट आहे. माहिती खात्याला पत्रकारांसाठी वेळ नाही. कसा असेल? ते लाखांचे मोर्चे थोडीच काढू शकतात?     yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी