शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा

By admin | Published: January 29, 2017 12:33 AM

दोन महिन्यांपूर्वी मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालो. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा... सर्व काही नवीन. पहिल्यांदाच देशाबाहेर आणि तेही राहण्यासाठी जात असल्याने खूप

- प्रवीण जोगळेदोन महिन्यांपूर्वी मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालो. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा... सर्व काही नवीन. पहिल्यांदाच देशाबाहेर आणि तेही राहण्यासाठी जात असल्याने खूप टेन्शन होतं. दुबईमध्ये भारतीयांचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे जास्त अडचणी येत नाहीत, असं ऐकून होतो. मात्र, त्याचा पुरेपूर अनुभव मी घेतला आहे. दुबईमध्ये जवळजवळ ६० टक्के भारतीय असल्याने मी आपल्याच देशात असल्याचं अनुभवत आहे.मात्र, तरीही कुटुंबीयांची, मित्रांची आठवण येतच राहते. त्यात आपले सण, उत्सव यापासून दूर असल्याने केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून काय तो आनंद मिळवावा लागतो. अशातच नुकताच झालेला आपला प्रजासत्ताक दिन मी अत्यंत वेगळ्या प्रकारे साजरा केला. कदाचित मी देशाबाहेर असल्याने असेल, परंतु यंदाच्या २६ जानेवारीला मी भारतीय असल्याचा अभिमान खूप वेगळा अनुभव देणारा ठरला. २४ जानेवारीच्या संध्याकाळी माझ्या मित्राने प्रजासत्ताक दिनी बुर्ज खलिफा इमारतीवर भारताच्या तिरंग्याची रोषणाई होणार असल्याचे कळवले. त्याला त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिजे होते. आधी वाटलं असं काही नसेल. परंतु, जेव्हा आॅफिसमध्ये याबाबत मित्रांना विचारलं असता बातमी पक्की असल्याचं कळलं. तेव्हा मात्र, खूप उत्सुकता लागली. शिवाय यंदाच्या प्रजासत्ताक दिनी यूएईचा प्रिन्स भारतात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित असल्याने बुर्ज खलिफा इमारतीजवळ नक्कीच जल्लोष असणार अशी खात्री पटली. त्यानुसार सर्व प्लानिंग करून ठरवलेल्या वेळेला मी बुर्ज खलिफा इमारतीजवळ गेलो आणि चकितच झालो. शेकडो भारतीय ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देत होते. इतकंच नाही, तर रस्त्यावरील बहुतेक दुकानांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सजावट करण्यात आली होती. भारताचा तिरंगा दुकानांबाहेर फडकत होता. एक वेळ मी भारतातच फिरत असल्याचा भास झाला. बुर्ज खलिफा परिसरात पोहोचताच क्षणी इमारतीवर लेझर शो सुरू झाला आणि क्षणात माझ्या डोळ्यांसमोर त्या गगनचुंबी इमारतीवर तिरंगा झळकू लागला. तो क्षण तर कधीच विसरता येणार नाही. मी पूर्णपणे गुंग झालो होतो. मी दुबईत असल्याचा विसर पडला. सुरुवातीला दबकत दबकत आलेलो मी अचानकपणे अभिमानाने त्या भव्य इमारतीकडे पाहत होतो आणि नकळत मी म्हणालो ‘भारतमाता की जय...’शिवाय या वेळी आॅस्कर विजेत्या ए.आर. रेहमान यांचं ‘जय हो’ हे गाणं वाजत होतं. सर्व काही अद्भुत होतं माझ्यासाठी. माझ्या डोळ्यांतून अचानकपणे अश्रू वाहू लागले होते. भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटत होता. दुसरीकडे, उपस्थित भारतीय उत्स्फूर्तपणे घोषणा देत असताना मी केवळ तो क्षण अनुभवत होतो. माझ्या तोंडून शब्दच पडत नव्हते. शाळेतला प्रजासत्ताक दिन सतत आठवत होता. आज परक्या देशात हा दिवस साजरा करताना आपले पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचं म्हणणं खरंच पटलं, ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा...’

(लेखक नोकरीनिमित्त दुबईत स्थायिक आहेत.)