शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

आजचा अग्रलेख: जातगणनाच उपाय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 9:51 AM

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर उत्तर प्रदेशातील निवडणुकांना दिलेली स्थगिती हा भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय झटका आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर उत्तर प्रदेशातील महापालिका, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती हा भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय झटका आहे. १७ महापालिका, २०० नगरपालिका व ५४५ नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षण के. कृष्णमूर्ती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टनुसार नसल्याच्या कारणाने निवडणुकीची अधिसूचना न्यायालयाने रद्द केली आहे. 

अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष व मायावती यांचा बहुजन समाज पक्ष भाजपवर तुदन पडले आहेत. सगळेच आरक्षण संपविण्याची ही सुरुवात असल्याची टीका होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र म्हणतात की, ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील. ही जणू दीड-पावणे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात याच मुद्द्यावर माजलेल्या राजकीय गदारोळाची पुनरावृत्ती आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाले तेव्हा ती तत्कालीन महाविकास आघाडीची निष्क्रीयता असल्याचा आरोप तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 'आमच्याकडे सत्ता द्या, चार महिन्यांत हा प्रश्न मार्गी लावू अन्यथा राजकीय संन्यास घेऊ,' अशी घोषणाही त्यांनी केली होती. 

योगायोगाने एकनाथ शिंदे व फडणवीसांचे सरकार सत्तेवर येताच बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर झाला व राज्य निवडणूक आयोगाला महापालिका, जिल्हा परिषदा- पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मिळाले. या निवडणुका झाल्या नाहीत, परंतु नुकतीच झालेली सात हजारांवर ग्रामपंचायतीची निवडणूक ओबीसी आरक्षणासह पार पडली. परंतु, आधीसारखे सरसकट २७ टक्के आरक्षण यात दिले गेले नाही. गावातील ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात आणि अनुसूचित जाती व जमातींसह एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत या स्वरूपात ते लागू झाले. महाराष्ट्रासारखीच स्थिती मध्य प्रदेशात उद्भवली होती आणि तिथेही सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ट्रिपल टेस्टच्या आधारेच अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. तिथेही ट्रिपल टेस्टच्या मुद्दयावर सरकारला दंडबैठका काढाव्या लागल्या. पलीकडे राजस्थानमध्ये ओबीसी आरक्षणातील काही विसंगतीच्या मुद्दयांवर काँग्रेसमधीलच दोन गट आमने-सामने आले होते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आधीचे सरकारी निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेऊन या मुद्दयावर उभा राहणारा असंतोष वेळीच आवरला. 

आता उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण योगींच्या गळ्याशी आल्यानंतर दक्षिणेकडे कर्नाटकमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याचे ओबीसी आरक्षण वाढविण्यावर विचार होत आहे. तिथे विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. एकेका राज्यात ओबीसी आरक्षणाचा पेच व त्या संतापाने देशव्यापी स्वरूप धारण केले तर कर्नाटकात फटका बसू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. उत्तर प्रदेश असो, कर्नाटक, मध्य प्रदेश असो की महाराष्ट्र, साधारणपणे शहरी सुशिक्षित वर्ग भाजपला मतदान करायचा तर ओबीसीबहुल ग्रामीण मतदार प्रादेशिक पक्षाकडे किंवा काँग्रेसकडे झुकलेला असायचा. विशेषत: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व इतर छोट्या पक्षांकडे झुकलेला इतर मागासवर्गीय मतदार अनेक वर्षांच्या प्रयत्नांती आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आले. अशावेळी ओबीसी आरक्षणाला राज्याराज्यांत धक्क्यांवर धक्के बसणे भाजपला परवडणारे नाही. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक संदर्भ असल्याने आधीच भाजपकडे ओबीसी प्रवर्गातील जाती थोड्या संशयाने पाहतात. सर्व प्रकारच्या आरक्षणाला भाजपचा विरोध असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जातो. या पार्श्वभूमीवर, बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने येत्या ७ जानेवारीपासून दोन टप्प्यात जातगणना घोषित केली आहे. बिहार भाजपचा अशा जातगणनेला स्पष्ट विरोध आहे. मुळात देशपातळीवरच अशी गणना करावी आणि ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा द्यावा, जेणेकरून राज्याराज्यांमध्ये असमानता राहणार नाही, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. २०११च्या जनगणनेत जातींची माहिती संकलित केली गेली. तथापि, ती सदोष असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे ती सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली नाही. एकूणच हा घटनाक्रम ओबीसींच्या आरक्षणाचा विचार राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी भाजपला बाध्य करणारा ठरू शकतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीUttar Pradeshउत्तर प्रदेश