शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

आयएमडीची बखोट कधी व कोण धरणार?

By shrimant mane | Published: September 03, 2023 6:47 AM

मान्सूनचे तीन महिने निघून गेले, तरी अर्धाअधिक महाराष्ट्र कोरडा आहे. पिके कधी तरारून उठलीच नाहीत. भुईतून वर आल्यापासून त्यांनी ...

मान्सूनचे तीन महिने निघून गेले, तरी अर्धाअधिक महाराष्ट्र कोरडा आहे. पिके कधी तरारून उठलीच नाहीत. भुईतून वर आल्यापासून त्यांनी माना टाकल्यात त्या तशाच आहेत. एकाही पिकाची खात्री नाही. खरीप हातचा गेल्यासारखा आहे. रब्बीचीही खात्री नाही. विशेषत: मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रावर पावसाचे नव्हे तर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. होते नव्हते ते मातीत टाकून बसलेला, त्यातून काहीच हाती लागणार नाही हे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. आता आभाळाकडे नजर टाकायचीही हिंमत त्याच्यात राहिलेली नाही. वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची, पोटापाण्याच्या बेगमीची चिंता प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे.

जनावरे खातील काय अन् जगतील कशी ही चिंता आहे. खेडी धास्तावली आहेत, तर शहरांच्या चेहऱ्यांवर चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत. चारा छावण्यांपासून ते रोजगार हमीच्या कामांपर्यंत अन् विद्यार्थ्यांच्या फीपासून ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपर्यंत सगळ्या दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारवर दबाव वाढतो आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधक आक्रमक आहेत आणि त्यांनी दुष्काळासारख्या अस्मानी संकटाचे राजकारण करू नये म्हणून सत्ताधारी मंडळी साळसूदपणाचे सल्ले देत आहेत. या गदारोळात एक महत्त्वाचा घटक मात्र नामानिराळा आहे. तो म्हणजे मान्सूनच्या पावसाचे गुलाबी चित्र रंगविणारे हवामानशास्त्रज्ञ आणि त्यांचे महान खाते म्हणजेच आयएमडी.

जिथे कुणीच कधी पोहोचले नाही त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याची कमाल दाखविणाऱ्या, आता सूर्याकडेही यान पाठविणाऱ्या भारतात सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेला, अर्थकारणावर मोठा परिणाम घडविणाऱ्या पावसाचा नेमका अंदाज वर्तविता येत नाही, ही किती मोठी शोकांतिका आहे. आयएमडीने गेल्या एप्रिलमधील पहिल्या दीर्घकालीन अंदाजापासून रंगविलेले- यंदा दमदार पाऊस पडेल, खरीप भलताच चांगला जाईल, शेती न्हातीधुती होईल हे चित्र आता काळवंडले आहे. गोडगोड स्वप्नांना धक्का बसला आहे. गुलाबी चित्रावर दुष्काळाचे वेदनादायी ओरखडे ओढले गेले आहेत. हवामान खात्याचा ९५ टक्के पावसाचा अंदाज हवेत उडून निघाला आहे. त्यांच्या अंदाजानुसार मुळात १ जूनला मान्सून केरळात दाखलच झाला नाही. तेव्हा, आयएमडीची कार्यपद्धती आणि तिची विश्वासार्हता यावर आता जाहीर चर्चेची गरज आहे.

जगातले बहुतेक देश अगदी मिनिटामिनिटांचे तंतोतंत अंदाज देत असताना भारत आणखी किती वर्षे मध्ययुगात वावरणार आहे? इतक्या मोठ्या आकाराच्या, प्रचंड लोकसंख्येच्या आणि जवळजवळ पावसावर शेती अवलंबून असलेल्या देशात हवामानाचे, पावसाचे, उष्णतेच्या लाटेचे अचूक अंदाज वर्तविणारी व्यवस्था आहे का? त्यासाठी विविध प्रकारच्या डॉपलर रडार यंत्रणेपासून आवश्यक त्या पायाभूत सुविधा आहेत का? ढगांची स्थिती दर्शविणाऱ्या उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे नियमितपणे जारी करणे हे ठीक, पण तेवढेच पुरेसे आहे का? अन्य देशांइतके आपले वेदर सॅटेलाइट्सचे जाळे तगडे नसले तरी उपग्रहांच्या आधारे साध्या मोबाइलवर दाखविले जाणारे तापमान आयएमडीकडे नोंद का नसते? साध्या उपग्रहांचा प्रत्येक तालुक्यात, किंबहुना दर वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्यांची गती, दिशा वगैरे नोंदी करणारी यंत्रणा आहे का? प्रदूषण, वाढते शहरीकरण, औद्याेगिकरणामुळे झालेली तापमान वाढ व हवामान बदलाच्या परिणामामुळे तासातासाला वातावरण बदलत असते. त्यांच्या नोंदीची यंत्रणा कधी उपलब्ध होणार आहे? आहे ती तोकडी व्यवस्था हाताळण्यासाठी मनुष्यबळ पुरेसे प्रशिक्षित आहे का? आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली वापरणारी तरुण तंत्रज्ञांची फळी आयएमडीकडे आहे का?  

टॅग्स :Farmerशेतकरीmonsoonमोसमी पाऊसMaharashtraमहाराष्ट्र