शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

भाष्य - अंदाज हवामानाचा

By admin | Published: March 27, 2017 12:16 AM

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान बदलामुळे सागरी पर्यटन, डोंगराळ भागातील तीर्थयात्रा व हिल स्टेशनवरील पर्यटन व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून हवामान बदलाचे पूर्वानुमान दिले जाणार आहे. हे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांच्या सोयीचे होणार आहे. औरंगाबाद ही तशी पर्यटनाचीही राजधानी समजली जाते. बीबी का मकबरा, पाणचक्कीसह शहरापासून जवळ असलेला दौलताबादचा किल्ला, वेरूळची लेणी, पांडव लेणी, अजिंठ्याची लेणी ही सर्व स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा येण्याचा काळ म्हणजे हिवाळा. साधारण आॅक्टोबरपासून तो सुरू होतो. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ३ लाख २० हजार ४४ भारतीय, तर पाच हजार ९४२ विदेशी पर्यटकांनी या स्थळांना भेट दिली. नोव्हेंबर महिन्यात ८ हजार ८३९ विदेशी पर्यटकांची स्थळांना भेट दिली. यावर्षी आॅक्टोबरमध्ये ५ हजार ७१० आणि नोव्हेंबरमध्ये ६ हजार ८०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. हवामान बदलाची सूचना देणाऱ्या या अ‍ॅपचा सर्वांना फायदाच होणार आहे. हवामान खात्याने घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, हवामान बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून सलग अवकाळीचा फटका बसत आहे. या गारपिटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, त्यांचा माल खराब होऊ नये म्हणून सरकारने काय केले? आपल्याकडे हवामान खात्याचा अंदाज सर्वांनाच ठाऊक. आज पाऊस पडणार असे हवामान खात्याकडून ज्या दिवशी सांगितले जाते त्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार, हे सर्वांनीच गृहीत धरलेले असते. अनेक वर्षांच्या अनुभवानेच हे शहाणपण आले आहे. असे हे हवामान खात्याचे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना किती लाभदायक ठरेल, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे हवामान खाते आणि सरकारने हवामानाचा अंदाज देताना जसे शेतकऱ्याला गृहीत धरले, तसे विदेशी पर्यटकांना गृहीत धरू नये एवढेच.