शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दृष्टिकोन : आम्ही चालवू हा पुढे वारसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 4:55 PM

निर्लेप आयुष्य जगलेल्या प्रकाश मोहाडिकर यांचा आज जन्मशताब्दी दिवस़ त्यांच्या हजारो अनुयायांसाठी ते कायम प्रेरणादायी ठरले़ त्यानिमित्त

प्रा. सुरेश राऊत  

९ जानेवारी, १९१९ रोजी प्रकाश मोहाडीकर यांचा अंमळनेर येथे जन्म झाला, म्हणूनच २०२० वर्ष मोहाडीकर कुटुंबीयांतर्फे व सानेगुरुजी परिवारातर्फे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्धार केला आहे. मोहाडीकर सर, साक्षात सानेगुरुजींचा अवतार, मातृप्रेमाबाबत साऱ्या जगाला समजावून सांगणारे व ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा मंत्र कवितेच्या रूपात तुमच्या- आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणारे सानेगुरुजी, आम्ही प्रत्यक्ष पाहिले नाहीत, परंतु त्यांचे वा:ड्मय, कविता, लहान मुलांसाठीच्या गोष्टी, मोहाडीकर सर आम्हाला सांगत असत. त्यांच्या बोलण्यातील गोडवा, प्रेम अगदी गुरुजींसारखा. खरे तर मोहाडीकर सर म्हणजे, आधुनिक जगातील सानेगुरुजीच होते. त्यांच्याबरोबर जवळपास ४०-४५ वर्षे राहिल्याने, प्रत्यक्ष सानेगुरुजीच आम्हाला अनुभवायला मिळाले आणि म्हणूनच आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो.

९ जानेवारी, २०१२ रोजी प्रकाशभाईंना ९४ वर्षे पूर्ण झाली, तरीदेखील त्यांचा उत्साह २५ वर्षांच्या तरुणाला लाजवेल असाच होता. एखादी गोष्ट सरांनी हाती घेतली की, त्यात वक्तशीरपणा, विषयाची मुद्देसूद मांडणी व त्यांच्या इतर सहकाºयांप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांवरील प्रचंड विश्वास हेच त्यांच्या कार्यपूर्तीचे गमक असायचे. त्यांच्या या सशक्त तब्येतीचे कारण विचारलेत, तर ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगत, ‘कार्य हेच माझे टॉनिक आहे.’ आॅक्टोबर, १९४४ रोजी प्रकाशभाई मुंबईत आले आणि दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.

तसेच स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुईया कॉलेजात प्रवेश घेतला. सकाळी शिक्षकाची नोकरी, दुपारी कॉलेज व रात्री उशिरापर्यंत चळवळीत भाग. अशा वेळी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास बंदी असणाºया राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणता यावे, याकरिता चळवळ घडवून आणली. म्हणूनच त्यांना शाळेतून कमी करण्यात आले. अशा वेळी प्रकाशभार्इंनी १९४४ साली अमरहिंद मंडळाची स्थापना केली. आज ६० पेक्षा जास्त वर्षे ही संस्था कार्यरत असून, भारतातील ख्यातनाम विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत.प्रकाशभार्इंचे एक अत्यंत वाखाणण्याजोगे काम म्हणजे शिक्षण अगदी तळागाळातील पोहोचले पाहिजे. हेच ध्येय ठेवून त्यांनी घरगड्यांच्या मुलांसाठी ग्यानबा विद्यालय चालू केले. पाहिलीपासून ते ११वी पर्यंत शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीत खूप प्रसिद्ध पावली. १९६१ साली दादरच्या सुविद्य मतदारांनी प्रकाशभार्इंना मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले. तेथेही त्यांना आदर्श नगरसेवक हा बहुमान मिळाला, तसेच त्यांची आदर्श शिक्षक म्हणूनही निवड झाली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी असलेल्या कोट्यातून राखीव असलेली ३ खोल्यांची जागा मोहाडीकर सरांना दिली होती, परंतु सरकारी नियमाप्रमणे त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याने आम्ही ही जागा स्वीकारू शकत नाही, असा शेरा मारून, जी जागा नाकारली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना व निकटवर्तीयांना सोबत घेऊन सानेगुरुजी रुग्ण साहाय्य ट्रस्टचा कारभार प्रकाशभार्इंच्या मार्गदर्शनाखाली चालू असतानाच, दि. १९ मे, २०१२ रोजी सर ही यात्रा संपवून इहलोकी रवाना झाले. त्यांच्याबरोबर काम करीत असताना दैवत्वाचे असाधारण दर्शन आम्हा सर्वांना झाले आणि म्हणूनच आम्ही त्यांना शब्द दिला, ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा'.( लेखक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत )