शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारबाह्य आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:50 AM

८ मार्चला साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांमधील बेरोजगाराची समस्या अधिक आहे, पण ही समस्या महिलांच्या समस्येच्या जटिलतेच्या आकलनासाठी समजून घ्यावी लागेल.

- शैलेश माळोदे८ मार्चला साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांमधील बेरोजगाराची समस्या अधिक आहे, पण ही समस्या महिलांच्या समस्येच्या जटिलतेच्या आकलनासाठी समजून घ्यावी लागेल. कारण महिलांच्या समस्या पुरुषांच्या समस्येचे अधिक गडद प्रतिबिंब असणार आहेत़ हा स्त्री - पुरुष असा लिंगभेदाचा नव्हे, तर ‘मानवीय’ प्रश्न आहे. या प्रश्नाबाबत आपण अमेरिकेतील संशोधनाचा आधार घेणार आहोत. कारण तिथे याबाबत खरेखुरे संशोधन सुरू होते, त्यावरून भारतासाठीचे बोध आपल्याला घेता येतील.जून, २०१८मध्ये बेरोजगारी ३.८ टक्के म्हणजे बऱ्याच वर्षांनी खूपच कमी होती आणि लेबर मार्केट बरे होते, परंतू या आकड्यांमध्ये एक महत्त्वाची बाब झाकली गेली. ती म्हणजे, गेल्या काही दशकांत बेरोजगार आणि कामाच्या शोधात नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या पुरुषांची संख्या खूपच वाढलीय. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत कार्यबलात सहभागाचा तो मुद्दा असून, अमेरिकेच्या कामगारांविषयी आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्थेतर्फे घरोघरी जाऊन पाहणीअंती प्रत्येक प्रौढाला तीनपैकी एका श्रेणीत ठेवण्यात येते. ते म्हणजे नोकरी, कामधंदा करणारे म्हणजे रोजगार असलेले, नोकरीच्या शोधात असलेले, पण प्रत्यक्षात कोणताही कामधंदा करणारे म्हणजे बेरोजगार आणि तिसरा प्रकार म्हणजे यापैकी दोन्ही गोष्टी न करणारे (नोकरी न करणारे आणि शोधणारे) म्हणजे कामगार बलातून बाहेर असलेले.महिलांची एकूण कार्यबलातील बेरोजगारी १९५०च्या ६६ टक्क्यांवरुन सध्या अवघ्या ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. बदलती सामाजिक स्थिती आणि महिलांसाठी करिअरच्या नव्या संधी लक्षात घेता, याबाबत आश्चर्य वाटू नये. मात्र, याबाबत विचार करता दीर्घकालीन मापनात पुरुषांमध्ये वेगळा ट्रेंड दिसून येतोय. १९५०मध्ये कार्यबाल बाह्य पुरुषांचे प्रमाण १४ टक्के होते, ते आता ३१ टक्के झालेय. याची कारणे सोपी आहेत, एक तर शिक्षण घेण्यात बरीच वर्षे व्यतीत होत असल्यामुळे त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात उशीर होतो. त्याचबरोबर, आयुर्मान वाढल्यामुळे लोकांच्या निवृत्तीचा काळही लांबलाय. १९५० मध्ये ६५व्या वर्षी निवृत्त होणारा पुढे आणखी १६ वर्षे जगत असे. आता तो त्यानंतर १८ पेक्षाही जास्त काळ जगताना दिसतो. अर्थात, शिक्षण आणि निवृृत्ती या दोघांद्वारे फक्त काही अंशी उकल होते. आता २५ ते ५४ या वयोगटांतील म्हणजे कामासाठी योग्य ‘प्राइम एज’ पुरुषांचा विचार करू. असे पुरुष शिक्षणाजोग्या वयापेक्षा पुढे आणि निवृत्तीच्या बरीच वर्षे आधीचे असतात, पण हा गटही कामगार बलातून बाहेर पडताना दिसतोय. १९५० साली फक्त ४ टक्के ‘प्राइम एज’ पुरुष बेरोजगार वा रोजगार न शोधणारे होते. आता ते प्रमाण ११ टक्के झालेय. जवळपास तिपटीने हे प्रमाण वाढल्याचे कारण म्हणजे शिक्षणाची पातळी कमी असणाऱ्यांसाठीच्या रोजगार संधी घटल्या आहेत, असे हार्वर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञांच्या संशोधनातून दिसून आलेय.एखाद्याला वाटेल की कमी शिक्षित, योग्य वयोगटातले (प्राइम एज) पुरुष वर्कफोर्समधून बाहेर पडल्यावर काय करत असतील? अमेरिकेत सामाजिक सुरक्षिततेची महत्त्वाची भूमिका आहे. तिथे अशाप्रकारे इनअ‍ॅक्टिव्ह असलेले ७५ टक्के योग्य वयोगटांतले लोक सरकारी मदत मिळणाºया घरातले असतात. हे एक कारण लोकांमध्ये काम वाटण्यातील रुची कमी असल्याचे असू शकते, असे तज्ज्ञ स्कॉट विनशिप यांचे मत आहे. तरुण लोकांना पालकांबरोबर राहण्याचा एक चांगला पर्याय असू शकतो. निदान काहींना तरी अमेरिकेत आपल्या तीस वर्षांच्या मुलाला कौटुंबिक घरातून हुसकून देण्यासाठी वृद्ध जोडप्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठवल्याच्याही केसेस आहेत. नितीनिर्धारकांनी या प्रश्नाला कसा प्रतिसाद द्यावा किंवा खरोखरच तसा प्रतिसाद आवश्यक आहे का? काम शोधणे हा वैयक्तिक निर्णय असतो आणि भारत अमेरिकेसारख्या मुक्त लोकशाही राष्टÑात स्वाभाविकपणे वेगवेगळे निर्णय घेणारे लोक असतात.एक उपाय म्हणजे, शिक्षण अधिक चांगला पद्धतीने देऊन आणि कौशल्य प्रतिक्षण देऊन संधी वाढविणे, त्यामुळे संधी वाढल्यास अर्थव्यवस्थेतील इतरही समस्यांची उक्कल होऊ शकेल, पण हे तितकसे सोपे नाही. शिक्षणासाठी अधिक पैशांची तरतूद हवी़ त्याने फरक पडेल, पण राजकीयदृष्ट्या हे खूप कठीण ठरू शकते. मुख्य म्हणजे, भारतासारख्या देशातील शिक्षण प्रणालीसाठी फक्त पैशांची नव्हे, तर मूलभूत सुधारांची गरज आहे. त्यासंबंधी जोरदार चर्चा हवी. अमरिकेत ती सुरू आहे. कामगारांविषयीच्या आकडेवारीतून दिसून येतेय की, अर्थव्यवस्था खूपच झपाट्याने आणि अगदी नव्या आव्हानांसह सातत्याने बदलतेय, याविषयी खूप लिहिले जातेय़, परंतु सोपी उत्तर मात्र खूपच लांबवर असल्याचेही जाणवतेय, पण सुरुवात तर होणे आवश्यक आहे.( विज्ञान लेखक)