शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जनतेपेक्षा मंत्री मोठे आहेत काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:13 PM

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याने न्यायासाठी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. सर्वसामान्य शेतकरी, माणूस न्यायासाठी मेला तरी चालेल, पण आमचे सरकार टिकले पाहिजे, अशी धारणा झालेल्या लोकांना आपण कुणाच्या जिवावर निवडून आलो आहोत, याची जाणीव सत्तेत बसल्यावर येत नसावी. त्यामुळेच त्यांना त्यांच्या प्रचारात अडचण ठरणाऱ्या लोकांना ते पोलीस बळाचा वापर करून स्थानबद्ध करतात. प्रसंगी बळजबरीने अटकाव करतात. लोकशाहीमध्ये जनता हीच सार्वभौम असते, याचे त्यांना भान राहत नाही. जनतेपेक्षा मंत्री मोठे आहेत काय? हे कधीतरी शहाण्या माणसांनी त्यांना विचारावे. थेट विचारता येत नसेल, तर मतपेटीतून तरी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अन्यथा लोकशाही हुकूमशाहीची जागा कधी घेईल याचा थांगपत्ताही लागणार नाही.

- धनाजी कांबळे

आपला देश लोकशाहीप्रधान आहे. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकरवी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही, असे नागरिकशास्त्रात शिकवले जाते. मात्र, प्रत्यक्षात लोकशाही व्यवहारात कुठेच दिसत नसल्याने केवळ एका मताचा अधिकार म्हणजेच लोकशाही वाटावी, अशी सध्याची परिस्थिती देशात आणि राज्यातही आहे. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे कोणालाही आपण नियंत्रित करू शकतो, असा एक फाजील विश्वास सत्ताधाऱ्यांमध्ये आलेला दिसतो. तो आताच्या भाजप सरकारमध्ये जसा आहे, तसाच तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताधाऱ्यांमध्ये होता. लोकशाहीमध्ये मताला लाखमोलाची किंमत आहे. याचा अर्थ माणसाला असामान्य महत्त्व आहे. तरी देखील जेव्हा सत्तेची धुंदी लोकांच्या डोक्यात जाते, तेव्हा ते सर्वसामान्य जनतेला गुलामाप्रमाणे वागवायला देखील मागेपुढे पाहत नाहीत, हे अतिशय घातक आणि गंभीर आहे. 

निवडणुका जाहीर झाल्यावर आज जे मिजास करतात, ते सरपटत मते मागण्यासाठी जिथे नीट मोटरसायकल जाऊ शकत नाही, तिथे चारचाकी घेऊन येतात. कधी कधी पायातले पायतान हातात घेऊन मतदाराच्या दारात पोचतात. ‘आम्ही अमूक करू, तमूक करू,’ अशी नेहमीची आश्वासने देऊन मते पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय लोकांची घाई असते. प्रत्यक्षात जेव्हा निवडून येतात, तेव्हा ते पाच वर्षांत त्या भागात फिरकत देखील नाहीत, ही वस्तुस्थिती सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. प्रत्येक वेळी नेत्यांच्या दौऱ्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेऊन अथवा स्थानबद्ध करून पोलिस बळाचा वापर केला जातो. नेत्यांच्या दौऱ्यात अडथळा येऊ नये, त्यांना कोणी काळे झेंडे दाखवू नयेत, म्हणून प्रशासनाला वेठीला धरून तशी तजवीज केली जाते. अशा वेळी आंदोलकांचा किंवा त्या पीडितांच्या न्याय्य मागण्यांचा विचारच केला जात नाही. केवळ नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारी यंत्रणा घेते. ती सर्वसामान्य माणसांची घेत नाही, हेच या लोकशाही व्यवस्थेतील उघडं वास्तव आहे. हे चित्र बदलायचं असेल, तर नेते जसे महत्त्वाचे आहेत, तशीच सर्वसामान्य जनता देखील महत्त्वाची आहे. जनतेशिवाय नेते तयार होऊ शकत नाहीत. किंबहुना जनतेशिवाय ते मंत्री, आमदार, खासदार देखील होऊ शकत नाहीत, याचे भान नेत्यांना कधी येणार हा खरा प्रश्न आहे.

 कोणताही विकास करत असताना कोणी ना कोणी तरी त्यामुळे बाधित होतात, हे कुणीही नाकारणार नाही. मात्र, जे बाधित किंवा पीडित आहेत, त्यांचा प्रश्न समजून घेऊन तो सोडविण्याच्या दृष्टीने काय करावे लागेल, याचा विचार न करता, त्यांच्याशी संवादच होणार नाही, अशी व्यवस्था केली जाते. पीडितांना स्थानबद्ध केले जाते, अटक केले जाते. ही एकप्रकारची दडपशाही नव्हे तर दुसरे काय? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण असो, अथवा कोणत्या धरणप्रकल्पाचे उद्घाटन असो. किंवा कोणत्या नेत्याचा दौरा असो, अशा प्रत्येक वेळी सर्वसामान्य जनतेला स्थानबद्ध करून, नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आहे. वय झालेले असताना देखील सरकारने सरकारी योजनेत बाधित जमिनीचा मोबदला देताना अन्याय केला म्हणून मायबाप सरकारचे दार ठोठावले, तरी पदरी निराशाच येणार असेल, तर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला कधी तरी समजणार आहे, का केवळ वेळ मारून नेणे आणि लढणाऱ्या माणसांना कोंडून ठेवून स्वत:चा दौरा फळाला आणणे एवढ्यातच सत्ताधारी धन्यता मानणार आहेत, हा खरा सवाल आहे.

महाराष्ट्राला एक प्रचंड मोठी परंपरा आहे. संविधानाने दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय जर मिळत नसेल, तर संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या हरएक माणसाला इथे न्याय मिळायलाच हवा. तसे होणार नसेल, तर ही इतके कोटी रुपये खर्च करून कामाला लावलेली सगळी यंत्रणा केवळ देखाव्यासाठी आहे का, हेही कधी तरी सरकारला विचारल्याशिवाय जनता राहणार नाही, हे सत्तेत बसलेल्या लोकांनी ध्यानात घ्यायला हवे. 

मुख्यमंत्री धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या दौऱ्यात अडथळा येऊ नये, यासाठी दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सकाळपासून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. हा प्रकारच चुकीचा असल्याने ‘जोपर्यंत मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत जाणार नाही,’ अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली. त्यामुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. मात्र, असे प्रत्येक ठिकाणी घडेलच असे नाही. विखरण ता. शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून  सकाळी सहा वाजल्यापासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. विशेषत:  नरेंद्र पाटील यांनी २४ डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी हमी दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही, असे त्यात म्हटले होते. तरीही त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर कारवाई करण्यात आली. आगामी काळात निवडणुका आहेत. त्या वेळी अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळी मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला असून, लेखी हमी दिल्यानंतरही कारवाई करणे म्हणजे जनतेवर विश्वास नसल्यासारखेच आहे, असेही म्हटले आहे. 

एकूणच लोकांना गृहीत धरून अथवा त्यांना नियंत्रित करून राज्य करता येत नाही. तर समोर आलेल्या आव्हानांचा अभ्यास करून योग्य मार्ग काढणे आणि संबंधित पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेणे महत्त्वाचे असते. धर्मा पाटील यांच्या परिवाराला स्थानबद्ध करून सरकारने आपली मानसिकता दाखवून दिली असून, अशापद्धतीने सर्वसामान्य माणसांना नियंत्रित करणे ही लोकशाहीची चेष्ठा आहे, हे सत्ताधार्यांनी ध्यानात घ्यावे. अन्यथा लोकमान्य टिळकांनी जो सवाल तेव्हा केला होता, तोच पुन्हा विचारावा लागेल, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस