शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सेनेची जखम व भाजपचा दुष्टावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:59 AM

युद्ध हे शस्त्रांनी करावयाचे राजकारणच आहे असे कार्ल व्हॉन क्लॉसवित्सने म्हटले आहे व ते खरे म्हणावे असेच आहे. पालघरच्या अशा युद्धात शिवसेनेला भाजपने केलेली जखम लवकर भरून येणारी नाही.

युद्ध हे शस्त्रांनी करावयाचे राजकारणच आहे असे कार्ल व्हॉन क्लॉसवित्सने म्हटले आहे व ते खरे म्हणावे असेच आहे. पालघरच्या अशा युद्धात शिवसेनेला भाजपने केलेली जखम लवकर भरून येणारी नाही. शत्रूने केलेला घाव उमदेपणाने दुर्लक्षिता येतो. मित्राने केलेला वार मात्र विसरता येत नाही. ज्या पक्षाशी एवढी दशके युती केली व ज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो त्याच पक्षाने निवडणुकीच्या रणात आपल्याला धूळ चारावी याएवढा अपमान दुसरा नाही. त्यातही सेनेचे दुर्दैव हे की हा अपमान मुकाट्याने गिळण्याखेरीज व आपली जखम दडवून ठेवण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा पर्याय नाही. हिंदुत्वाचा टिळा माथ्यावर असल्याने सेनेला महाराष्ट्रात मित्र नाही आणि ज्याच्या माथ्यावर तो टिळा मोठा आहे तो पक्ष सेनेला क:पदार्थ लेखणारा आहे. विधानसभेत सेनेच्या ६३ जागा आहेत आणि १२२ जागा मिळविणारा फडणवीसांचा पक्ष त्याच बळावर सत्तारूढ झाला आहे. पण त्याचा पाठिंबा काढून घ्यायचा तर राज्यात कुणाचे सरकार आणायचे हा पेच सेनेसमोर आहे. पवारांची काँग्रेस (४१ जागा) तिला पाठिंबा देण्याच्या अवस्थेत नाही आणि काँग्रेस पक्ष (४२ जागा) सेनेचा पाठिंबा कधी घेणार नाही. या स्थितीत कोणत्या तरी मित्र नसलेल्या पक्षामागे आपली माणसे उभी करणे एवढाच पर्याय सेनेजवळ शिल्लक राहतो. जवळचे जवळ नाहीत आणि दूरचे जवळ येण्याची शक्यता नाही या स्थितीत आपली जखम कुरवाळणे आणि ईव्हीएमला नावे ठेवणे याखेरीज सेनेला काही करता येणारेही नाही. फडणवीसांचे सरकार स्थापन होत असताना सेनेने काही काळ खळखळ करून त्यात सहभागी व्हायचे टाळले होते. त्यावेळी ‘तुम्ही पाठिंबा देत नसाल तर आम्ही देऊ’ अशी भूमिका घेऊन शरद पवारांनी फडणवीसांना तारून नेले. नंतरच्या काळात सेनेने मिळतील त्या जागा घेत फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला. मात्र आपले वेगळे अस्तित्व दाखविणे ही सेनेची तेव्हाची व आताचीही गरज असल्याने प्रत्येकच लहान लहान बाबीवर टीका करीत सरकारला नावे ठेवण्याचे व्रत तिने सोडले नाही. मात्र कितीही टीका केली तरी सेनेला आपल्यासोबत राहण्याखेरीज गत्यंतर नाही हे ठाऊक असणाऱ्या भाजपने तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण सोडले नाही व त्याचवेळी ‘युती कायम राहील’ ही मधाळ भाषाही थांबविली नाही. वास्तव हे की भाजपला सेनेची ताकद व मर्यादा कळते. सेनेला महाराष्ट्रात मित्र नाहीत आणि महाराष्ट्राबाहेर स्थान नाही. शिवाय स्वबळावर सत्ता ताब्यात आणण्याएवढे बळही तिच्यात नाही. त्याचमुळे ‘सेनेच्या प्रवक्त्याला मी मोजत नाही’ असे फडणवीसांना म्हणता येते. एकेकाळी प्रमोद महाजन आणि मुंडे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची समजूत काढत. काही काळ गडकरीही ते करीत. आता मात्र भाजपमधील साºयांनाच बाळासाहेब आणि उद्धव यांच्यातला फरक कळतो व सेनेचे अस्तित्व कुठवर याचाही अंदाज घेता येतो. सेना भाजपची माणसे आपल्याकडे वळवू शकत नाही उलट भाजप मात्र सेनेतले काही सैनिक पळवून नेऊ शकतो या वास्तवाची कल्पना उद्धव ठाकºयांनाही असावी. फडणवीसांनी आपली चालविलेली फरफट त्याचमुळे ते सहन करीत असावे. मुळात सेनेजवळ कोणते धोरण नाही, कार्यक्रम पत्रिका नाही आणि मराठीचा अभिमान व मुसलमानांचा द्वेष हे धोरण आता फारसे विश्वासार्ह उरले नाही. गेल्या ५० वर्षात सेनेला आपले अस्तित्व विस्तारणेही जमले नाही. या साºयाच आघाड्यांवर भाजप सेनेच्या फार पुढे आहे. जे पक्ष केवळ एका नेत्याच्या बळावर उभे असतात त्यांना फारसे भवितव्यही नसते हे वास्तव सेनेएवढेच राष्टÑवादी काँग्रेसलाही लागू आहेत. सबब अशा पक्षांना दुसºया पायरीवर थांबण्याखेरीज वेगळे काही करता येत नाही. ते जमले नाही तर तीही पायरी काढून घेतली जाण्याचे भयच त्यांच्यापुढे मोठे असते. या पुढला काळ सेनेची दयनीय फरफट व भाजपने तिच्याशी चालविलेला दुष्टाव्याचा खेळ महाराष्टÑाला पाहायचा आहे. तो खेळ सेनेला किमान स्वाभिमानपूर्वक खेळता यावा एवढीच सदिच्छा येथे नोंदवायची आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा