शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

विशेष लेख: आदिपुरुष: ही असली भाषा लिहितातच का?

By विजय दर्डा | Published: June 26, 2023 12:00 PM

Adipurush : आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते

- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते. 'धनुष्याच्या प्रत्यचेतून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधी परत येत नाही. त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम तेवढाच समोर येतो. अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. हा शब्द म्हणजे भाषा. मग ती बोली असो वा लेखी।

आदिपुरुष चित्रपटाच्या संवाद लेखनात कशा प्रकारची भाषा वापरली गेली, हे एव्हाना आपल्या सर्वांना माहीत झाले आहे. सद्य:स्थिती विचारात घेऊन संवाद लिहिले गेले आहेत असे म्हणून ते स्वीकारता येणार फरफटत आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम घातकच होतील. महाभारत मालिकेचे संवाद लेखन करणाऱ्या राही मासूम रजा यांची आठवण होते. त्यांनी लिहिलेले भारदस्त संवाद आजही लोकांच्या जिभेवर खेळतात. ब्रिटिश कालखंडावर आधारित 'लगान' हा चित्रपट घ्या; त्यासाठी जावेद अख्तर यांनी कोणते गीत लिहिले? 'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले. राधा कैसे न जले... चित्रपट तर नव्या जमान्यातला होता, परंतु जावेदभाईंनी लिहिलेले गीत किती शालीन आहे.

याच्या अगदी विरुद्ध मनोज मुंतशीर यांनी टपोरी भाषेत 'आदिपुरुष'चे संवाद लिहिले यूट्यूबवर जाऊन पाहाल तर काही तथाकथित संतसुद्धा अशी भाषा वापरताना दिसतील म्हणा तसे तर मनोज यांना आपल्या नावापुढे केवळ मुंतशीर खटकले, तेव्हा म्हणे त्यांनी तत्काळ शुक्ल हा शब्दही जोडला... पण म्हणून त्यांनी केलेला अपराध कसा माफ होईल ? मनोज मुंतशीर है विसरले की चित्रपटांचे संवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. अनेक संवाद कालजयी होतात. 'जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पर पत्थर नही फैका करते.......

आपल्या भाषेबरोबर हा घृणास्पद खेळ व्हावा, हे दुर्दैवच. भाषेच्या पावित्र्याला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व दिले गेले आहे. मला सुषमा स्वराज यांची तीव्रतेने आठवण येते. रामायणातीलच एक प्रसंग राम-रावण युद्धाच्या आधी रामाने शिवस्तुतीसाठी रुद्राष्टकम म्हटले तेव्हा रावणाने शिव तांडव स्तोत्र म्हटले. लोक आजही रुद्राष्टकम म्हणतात; परंतु शिव तांडव स्तोत्र कोणी म्हणत नाही. हा आहे भाषेचा प्रभाव. 

भाषेच्या सटीकतेचे आणखी एक उदाहरण सुषमाजींनी दिले होते. दंडी नावाच्या रचनाकाराने दशकुमारचरितम् नाटक लिहिले. त्यातील एक राजपुत्र शिकारीला जातो आणि कोणाच्या तरी बाणाने त्याचा एक ओठ फाटतो. आता ओठ फाटल्यावर प भ ब भ म कसे उच्चारणार?- म्हणून मग नंतरच्या नाटकात राजपुत्राच्या तोंडी कोणत्याही संवादात ओष्ठव्य म्हणजे ओठांच्या साहाय्याने उच्चार करावे लागणारे शब्द नाहीत. हाही भाषेचा चमत्कार!भाषेच्या बाबतीत इतकी काळजी घेणाऱ्या देशात टपोरी भाषा बोलली जाऊ लागली आणि चित्रपटातील संवादाच्या रूपाने प्रकट होऊ लागली, राजकारणातील भाषेच्या कडवटपणामुळे समाज संकटात सापडला तर ते फार गरजेचे आहे. खूप मोठे दुर्भाग्य ठरेल. मी याच वर्षी २७ मार्च रोजी या सदरात भाषेविषयी गांभीर्याने लिहिले होते. जेव्हा भाषेचा दर्जा घसरतो, भाषा धर्माचा रंग घेते, भावनांकडे लक्ष देत नाही, तेव्हा असा समाज विघटनाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण होत असते.

मोठमोठी युद्ध भाषेमुळेच झाली आहेत! दुर्योधनाने जर आपली मांडी थोपटली नसती आणि द्रौपदीचा अपमान केला नसता तर कदाचित महाभारत घडलेच नसते. भाषेची आपली एक मर्यादा असते. भाषा म्हणजे केवळ अक्षर नाही. हल्ली तर आपण संस्कृतला भगवा रंग दिला, उर्दूला हिरवा ही किती मोठी विटंबना आहे! काही भाषांचा संकोच झालेला आपण पाहतो, भविष्यकाळात त्या नष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको, कोविडने लोकांचा जीव घेतलाच, पण एक भाषाही समाप्त केली हे आपल्याला ठाऊक आहे. काय? अंदमान निकोबारमध्ये राहणाऱ्या ५० वर्षांच्या लीचोचा मृत्यू झाल्याने 'सारे' नावाची एक भाषा काळाच्या पडद्याआड गेली. भाषा बोलणारी ती एकमेव व्यक्ती शिल्लक होती. जेरू भाषा बोलणारेसुद्धा दोन-तीन लोकच शिल्लक आहेत. युनेस्कोच्या यादीत अशा १९७ भाषांची नोंद आहे, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पीपल्स लिग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या ५० वर्षात २२० भाषा संपल्या. हे भीतीदायक आहे.

पण मग आता काय करायचे ? प्रथम स्वतःची भाषा सुधारावी काही मुखांना शब्दाशब्दाला शिव्या देण्याची सवय असते; तर समाजानेही तेच चलन मान्य करावे काय? अजिबात नाही. समाज असा वागत नाही! हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मवर भरपूर शिवीगाळ असलेल्या वेब सिरीज दाखवल्या जातात, त्यावर लोकांनी बहिष्कार टाकला तर या मालिकांमध्ये शिव्यांची भरमार करणारे दहावेळा विचार करतील. शिव्यांपासून आपल्या मुलांना वाचविणे फार गरजेचे आहे.

आपण जे बोलत आहोत त्याचा परिणाम काय होईल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण आपल्या धर्माचे आचरण करावे, परंतु दुसऱ्याच्या धर्मावर टीका करता कामा नये. यातून विनाकारण वैमनस्य वाढते. आपल्या जागतिक वाटचालीत वैमनस्य हा सर्वांत मोठा अडथळा ठरेल. आपल्या जिभेवर, लेखणीवर लगाम लावला तर आपण कित्येक संकटांपासून देश वाचवू शकतो. तुम्ही आम्ही बदलू, तर माणसे, जग बदलेल. भाषेतून जसे प्रेम उत्पन्न होते, तसेच भाषा कटुताही निर्माण करते. प्रेम की कटुता यातली निवड अखेर आपल्यालाच करायची आहे, 

टॅग्स :Adipurushआदिपुरूषbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा